Monday, 12 January 2026

कॉंग्रेसचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या पत्नी सविता पाटील यांचे निधन ..

कॉंग्रेसचे माजी नगरसेवक माणिक पाटील यांच्या पत्नी सविता पाटील यांचे निधन ..

उरण दि १२, (विठ्ठल ममताबादे) : उरण कोटनाका येथील सविता माणिक पाटील (वय ६७) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. कॉंग्रेसचे माजी नगरसेवक माणिक अनंता पाटील यांच्या पत्नी; तर प्रशांत, हेमंत, देवेंद्र माणिक पाटील यांच्या त्या आई.

त्या मनमिळाऊ स्वभावाच्या होत्या. त्या सर्व सुख-दुःखाच्या प्रसंगी सर्वांच्या मागे सावलीसारखी साथ देत असत. पाटील कुटुंबात त्यांनी अतिशय तळमळीने सर्वांना सांभाळले.

आंतरराष्ट्रीय कामगार नेते आणि कॉंग्रेसचे रायगड जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी नुकतेच प्रशांत पाटील यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन केले.दिवंगत सविता पाटील यांच्या मागे पती, मुले, सुना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्यांचे उत्तरकार्य शुक्रवारी (ता. १६) होणार आहे

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...