सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांची कौतुकास्पद शैक्षणिक बांधिलकी. !!
सैतवडेचे सरपंच साजिद शेकासन यांनी नुकतेच जि. प. शाळा नंबर १ व जि. प. शाळा नंबर २, तसेच आयुष्मान आरोग्य मंदिर सैतवडेला भरीव सहकार्य केले. जिल्हा परिषद शाळा नं. १ ला ग्रामपंचायतीच्या वतीने टी. व्ही. व स्वखर्चाने प्रिंटर दिला. आयुष्मान आरोग्य मंदिर सैतवडेला ग्रामपंचायत कडून लॅपटॉप व प्रिंटर स्वखर्चाने दिला. जि.प.शाळा नं. २ ला ग्रामपंचायत कडून टी. व्ही. व प्रिंटर स्वखर्चाने दिला.
यावेळी जि. प. शाळा एकचे ज्ञानेश्वर ढाकणे, ग्रामपंचायत अधिकारी राजकुमार प्रक्षाळे, उपसरपंच सुवेश चव्हाण, जि. प. शाळा नंबर दोनच्या मुख्याध्यापिका स्नेहा जाधव, कानडे मॅडम पालक तसेच शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा नियती कदम, मनोज सावंत,
श्री मोहन तांबे( आरोग्य सहाय्यक ),प्राथमिक आरोग्य केंद्र वाटदच्या धनश्री विष्णू पावरी (समुदाय आरोग्य अधिकारी,उपकेंद्र सैतवडे,आशा सेविका प्रणाली पवार,सुजाता खापले,पूनम पवार आदी उपस्थित होते) तसेच या दोन्ही शाळांना पाण्याची उत्तम सोय व्हावी म्हणून पाण्याची टाकीही प्रदान केली. शाळांना या शैक्षणिक मदतीमुळे ऑन लाईनची कामे करणे सुलभ होणार आहे. शैक्षणिक गरजाकडे विशेष लक्ष देवून त्याना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून सोडविण्याबरोबर प्रसंगी पदरमोड करुन शाळांना भरीव सहकार्य केल्याबद्दल सरपंच साजिद शेकासन यांचे पालक वर्गातून तसेच शिक्षकांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या प्रमुख डॉ.श्रुती कदम यांनीही या विशेष सहकार्याबद्दल आभार व्यक्त केले.
प्रसिद्धीसाठी - विलासराव कोळेकर सर
No comments:
Post a Comment