Wednesday, 7 January 2026

श्री युवराज बच्छे पत्रकार यांना "जिवन गौरव दर्पण रत्न पुरस्कार प्रदान" !!

श्री युवराज बच्छे पत्रकार यांना "जिवन गौरव दर्पण रत्न पुरस्कार प्रदान" !!

मलकापूर, प्रतिनिधी :
मराठी पत्रकार दिनानिमित्त हिंदी, मराठी पत्रकार संघाच्या वतीने आयोजीत दर्पण रत्न पुरस्कार सन २०२६ कार्यक्रम मलकापूर येथील मराठा मंगलकार्यालय येथे आयोजीत करण्यात आला. सदर कार्यक्रमात चाळीसगाव तालुक्यातील कळमडू येथील श्री. युवराज नामदेव बच्छे यांना राज्यस्तरीय पत्रकार 'जिवन गौरव दर्पण रत्न" पुरस्कार प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार डॉक्टर, प्राचार्य व्ही. बी. कोलते, इंजिनिअरींग कॉलेज मलाकापूर यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी दिनेश तायडे, सहाय्यक माहिती आयुक्त, मंत्रालय, मुंबई यांचे हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमात सुबेदार दिनेश तायडे, कारगील योध्दा, धनश्रीताई काटीकर पाटील, महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा हिंदी, मराठी पत्रकार संघ, श्री. दामोधर शर्मा, शेतकरी नेते, श्री. अशांतभाई वानखेडे, संस्थापक समतेचे निळे वादळ, कार्यक्रमाची सुरवात आद्य पत्रकार बाळशास्त्री जांबेकर व महिला संपादक तानुबाई बिरजे यांच्या प्रतिमा पुजनाने करण्यात आले. कार्यक्रमात पत्रकार, शिक्षण, सामाजिक, राजकीय, कला, वैद्यकीय, उद्योजक, क्रीडा अशा अनेक क्षेत्रातील कर्तुत्वान व्यक्तींचा दर्पण रत्न पुरस्कार २०२६ देऊन गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी, देशासाठी आपल्या प्राणाची परवा न करता देशसेवा करणाऱ्या तसेच कारगील युध्दात महत्वाची भूमिका बजावणाऱ्या सुबेदार दिनेश तायडे, माजी सैनिकाचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन कोमल पाटील यांनी केले तसेच आभार प्रदर्शन श्रीकृष्ण तायडे यांनी केले.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...