Sunday, 11 January 2026

जनजागृती सेवा संस्थेकडून विशाल शांताराम कुरकुटे यांना सन्मानपत्र !!

जनजागृती सेवा संस्थेकडून विशाल शांताराम कुरकुटे यांना सन्मानपत्र !!
बदलापूर, प्रतिनिधी :
मराठी पत्रकारितेचे जनक दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त जनजागृती सेवा संस्था (रजि.) यांच्या वतीने सामाजिक, पत्रकारिता व साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे विशाल शांताराम कुरकुटे यांना सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले.
पत्रकार, लेखक, संपादक, समाजसेवक म्हणून विविध माध्यमांतून समाजजागृतीचे कार्य सातत्याने करत असल्याबद्दल हा सन्मान प्रदान करण्यात आला. वर्तमानपत्र, न्यूज पोर्टल, डिजिटल मीडिया आदी माध्यमांतून त्यांनी समाजातील प्रश्न मांडत जनतेचा आवाज बुलंद केला आहे.

या सन्मानामुळे पुढील काळातही सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रात अधिक जोमाने कार्य करण्याची प्रेरणा मिळाल्याची भावना विशाल कुरकुटे यांनी व्यक्त केली. जनजागृती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गुरुनाथ म. तिरपणकर व सचिव सविता भंडारी यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...