सिद्धी सागर कडू यांचा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश !!
** महाविकास आघाडी तर्फे चाणजे जिल्हा परिषद गटासाठी उमेदवारी जाहीर.
उरण दि १९, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यातील चाणजे विभागातील सिद्धी सागर कडू यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना जिल्हाप्रमुख तथा माजी आमदार मनोहरशेठ भोईर यांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेऊन जिल्हाप्रमुख संपर्क कार्यालय, उरण येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात जाहीर प्रवेश केला.याचप्रसंगी सिद्धी सागर कडू यांची महाविकास आघाडीच्या वतीने चाणजे जिल्हा परिषद गटातून उमेदवारी जाहीर करण्यात आली.
यावेळी उपजिल्हाप्रमुख नरेश रहाळकर, तालुकाप्रमुख संतोष ठाकूर, तालुका संपर्कप्रमुख दिपक भोईर, केगाव विभागप्रमुख एस.के.पुरो, चाणजे विभागप्रमुख ऍड नितेश पाटील, माजी सभापती ऍड सागर कडू, कामगार नेते गणेश घरत, भेंडखळ माजी विभागप्रमुख पंढरीनाथ घरत, शाखाप्रमुख शैलेश भोईर, युवासेना विधानसभा अधिकारी निशांत घरत, सरपंच चेतन गायकवाड, माजी सरपंच जगजीवन नाईक, माजी सरपंच मोहन काठे, उपशाखाप्रमुख सुरेश पाटील, निलेश पाटील, भालचंद्र पाटील, संदिप जाधव हे उपस्थित होते.सिद्धी सागर कडू यांच्या उमेदवारी मूळे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
No comments:
Post a Comment