Monday, 2 February 2026

महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील,दिपक भोईर,परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी !!

महाविकास आघाडीचे प्रेरणा पाटील,दिपक भोईर,परेश ठाकूर यांची प्रचारात आघाडी !!

** जनतेचा मिळत आहे उत्स्फूर्त प्रतिसाद

** महाविकास आघाडीच्या उमेदवारांना जनतेचा भरभरून आशीर्वाद 

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण तालुक्यात जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या उमेदवारांतर्फे जोरात प्रचार सुरु असून महाविकास आघाडी तर्फे नवघर जिल्हा परिषद सदस्य पदासाठी प्रेरणा कुणाल पाटील (निशाणी मशाल), भेंडखळ पंचायत समिती सदस्य पदासाठी दिपक सुरेश भोईर (निशाणी मशाल) तर नवघर पंचायत समिती सदस्य पदासाठी परेश धनाजी ठाकूर (निशाणी मशाल) हे निवडणूक लढवीत आहेत. स्वच्छ, चारित्र्य संपन्न, विकासाभिमुख व जनतेच्या समस्यांची उत्तम जाण असलेले हे उमेदवार आहेत.उरण तालुक्यातील नवघर जिल्हा परिषद व भेंडखळ पंचायत समिती व नवघर गणात महाविकास आघाडीने सत्ता बदलाची घंटा जोरात वाजवली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाच्या उमेदवार प्रेरणा कुणाल पाटील आणि दीपक सुरेश भोईर, परेश ठाकूर यांनी रस्त्यावर उतरून केलेल्या आक्रमक, ज्वालाग्रही प्रचारामुळे संपूर्ण मतदारसंघ ढवळून निघाला असून विरोधकांची राजकीय जमीन अक्षरशः सरकताना दिसत आहे.

यावेळी जाहीर सभांच्या दिखाव्याला फाटा देत जनतेच्या दारात जाऊन थेट सवाल विचारणारा प्रचार प्रेरणा पाटील,दीपक भोईर,परेश ठाकूर यांनी राबवला आहे . विकास कोणाचा? स्वाभिमान कुणाचा? आणि लोकशाही कुणासाठी ? असे थेट प्रश्न जनतेसमोर ठेवत त्यांनी महाविकास आघाडीचा लढा हा सत्तेसाठी नव्हे, तर जनतेच्या हक्कासाठीचा संघर्ष असल्याचे ठामपणे मांडले.

या स्पष्ट भूमिकेला नागरिकांनी उस्फूर्त प्रतिसाद देत महाविकास आघाडीच्या बाजूने उघडपणे कौल दिल्याचे चित्र उभे राहिले आहे. उरण बालई व काळाधोंडा, बोकडविरा, कुंडेगाव, पागोटे परिसरात झालेल्या प्रचारात घोषणांनी आसमंत दणाणून गेला. हात जोडत, प्रश्न विचारत आणि रोखठोक बोलत मतदारांनी 'यावेळी बदल अटळ', 'खोट्यांना जागा नाही', असा स्पष्ट इशारा विरोधकांना दिला. प्रचारस्थळी दिसलेला जनसमुदाय पाहता विरोधकांचा आत्मविश्वास ढासळलेला असून त्यांची प्रचारयंत्रणा पूर्णतः कोलमडली आहे, हे लपून राहिलेले नाही.या रणसंग्रामात महाविकास आघाडीचे घटक पक्ष असलेल्या काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (श्री. शरदचंद्र पवार गट), शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना (श्री उद्धव बाळासाहेब ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचे सर्वच नेते, पदाधिकारी,असंख्य निष्ठावंत कार्यकर्ते, महिला आघाडी आणि युवक मोठ्या संख्येने मैदानात उतरले आहेत. प्रचारात जनतेनी महाविकास आघाडीच्या सर्वच उमेदवारांना भरभरून आशीर्वाद दिला असून  मोठया मताधिक्याने निवडून या असा आशीर्वाद दिला आहे.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...