उरण कोर्टासमोर तसेच तेलीपाडा, नवीन शेवा येथे गतिरोधक बसविण्याची शेतकरी कामगार पक्षाची मागणी !!
** मयूर सुतार यांनी दिले प्रशासनाला निवेदन.
उरण दि ५, (विठ्ठल ममताबादे) : उरण शहरात उरण न्यायालय समोर दिवसेंदिवस रहदारी वाढत असून त्यातही उरण न्यायालय समोरील उरण मोरा मुख्य रस्त्यावर विविध वाहने वेगाने ये जा करीत असतात. वेगाने जाणाऱ्या वाहणामुळे या मार्गावर अनेक अपघात झालेले आहेत. काही किरकोळ अपघात सुद्धा झाले आहेत. या अपघात मूळे नागरिकांचे जीव धोक्यात आले आहे. त्यामुळे भविष्यातील खबरदारीचा उपाय म्हणून भविष्यात कोणतेही अपघात होऊ नये, अपघात होऊन कोणाचा मृत्यू होऊ नये या अनुषंगाने उरण कोर्टासमोर गतिरोधक बसविण्यात यावे अशी मागणी शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी उरण नगर परिषद प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केले आहे. तसेच मयूर सुतार यांनी उरण पनवेल मुख्य रस्त्यावर तेलीपाडा, नवीन शेवा येथे शासनाकडे पाठपुरावा करुन गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी सिडको प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे केली आहे.तसे निवेदन सुद्धा दिले आहे.गतिरोधक झाल्यास वाहनाचा वेग कमी होऊन अपघाताचे प्रमाण कमी होईल . भविष्यात होणारे अपघात टळतील. त्यामुळे जिथे जिथे अपघाताची शक्यता आहे तिथे तिथे मयूर सुतार स्वतः प्रत्यक्ष पाहणी करून गतिरोधक बसविले आहेत. अपघात होऊ नये यासाठी मयूर सुतार हे प्रयत्नशील आहेत.
उरण कोर्टासमोर गतिरोधक असणे हे अत्यंत अत्यावश्यक झाले आहे कारण की, त्या ठिकाणी कामानिमित्त कोर्टाचे न्यायाधिश तसेच बरचसे वकील, फिर्यादी, जमीनीच्या व्यवहासंबंधी म्हातारे लोक त्यांच्या कामानिमित्त ये-जा करित असतात, तसेच युईएस शाळेचे कॉलेज मुल-मुली देखील पायी येत-जात असतात. आज त्या ठिकाणी गतिरोधक नसल्याकारणाने काही वाहने अतिवेगाने जात आहेत, दुर्देवाने कुणाचा अपघात होऊ नये. निष्पाप जीव जाऊ नये, म्हणून आपण त्याठिकाणी लवकरात लवकर गतिरोधक बसवावे अशी मी मागणी केली आहे. तेलीपाडा व नवीन शेवा येथेही गतिरोधक बसविण्यात यावेत अशी मागणी सिडको कडे सुद्धा केली आहे.या ठिकाणी अनेक किरकोळ अपघात झालेले आहेत. या ठिकाणी गतिरोधक झाल्यास भविष्यातील होणारे अपघात टाळता येतील असे मत शेतकरी कामगार पक्षाचे उरण विधानसभा अध्यक्ष मयूर सुतार यांनी व्यक्त केले आहे
No comments:
Post a Comment