Monday, 2 February 2026

पडघा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी !!

पडघा येथे संत शिरोमणी रोहिदास महाराज जयंती उत्साहात साजरी !!

** समता, शिक्षण व सामाजिक न्यायाचा संदेश देणाऱ्या कार्यक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद

भिवंडी प्रतिनिधी, (मिलिंद जाधव) : 

भिवंडी तालुक्यातील साखरचौथ मित्र मंडळ, संत रोहिदास नगर, पडघा यांच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची ६४९ वी जयंती दिनांक १ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी संत रोहिदास नगर, पडघा येथे भक्तिभाव व उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीस संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाल अर्पण करून अभिवादन करण्यात आले. संत रोहिदास महाराजांनी दिलेला समता, शिक्षण व सामाजिक न्यायाचा विचार पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा निर्धार यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला. संत रोहिदास महाराजांचे विचार व कार्य समाजाच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदैव प्रेरणादायी ठरतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने महिलांसाठी राजेश्री राजेश जाधव यांच्या वतीने हळदी-कुंकू समारंभ तसेच पैठणी लक्की ड्रॉ कूपनचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मोठ्या संख्येने महिलांनी उपस्थिती लावली. महिलांसाठी आयोजित पैठणी खेळाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून परिसरात आनंदाचे वातावरण पाहायला मिळाले. या कार्यक्रमास माजी सरपंच अमोल बिडवी, रविंद्र विशे, शशांक तांबोळी, पराग पाटोळे, शैलेश बिडवी, माजी उपसरपंच दिपाली क्षिरसागर, पोलीस पाटील राजेश साळुंके, राजेश फकिरा जाधव, सामाजिक कार्यकर्ते चंदू जाधव, जयवंत वाळंज, पत्रकार मिलिंद जाधव, सामाजिक कार्यकर्ते कमलेश जाधव यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच सूरज भोईर, मोहित भोईर, अमोल जाधव, अनिकेत भोईर, ओंकार जाधव, संकेत जाधव, शुभम जाधव, दीपेश वाळंज, ऋषभ वाळंज, राहुल जाधव, जयेश जाधव, आकाश जाधव, मितेश जाधव, प्रतीक दळवी, अविनाश जाधव, संतोष जाधव, संतोष दळवी, नितेश जाधव, राज जाधव, यश जाधव, श्लोक जाधव यांच्यासह रोहिदास नगर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी रोहिदास नगर, पडघा येथील तरुणांनी विशेष मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयवंत वाळंज यांनी केले.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...