राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे अस्थी कलश पूजन व सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन !!
उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) ::
सर्वांचे प्रेरणास्थान,उत्तम प्रशासक, उत्तम राजकारणी, जनतेचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या अस्थीकलशाचे पूजन व श्रद्धांजली पर सर्वपक्षीय शोकसभेचे आयोजन बुधवार दिनांक ०४ फेब्रुवारी २०२६ रोजी ठीक सकाळी ०९:३० ते ११:०० या वेळेत आनंदी हॉटेल कोटनाका उरण येथे करण्यात आले असून शोक सभे नंतर अस्थी विसर्जन माणकेश्वर मंदिर केगाव समुद्र किनाऱ्यावर करण्यात येणार आहे.तरी अजितदादा पवार यांच्यावर प्रेम करणाऱ्या चाहत्यांनी व सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्त्यांनी अजितदादा पवार यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी या शोकसभेस उपस्थित राहावे असे आवाहन उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी केले आहे
No comments:
Post a Comment