Monday, 2 February 2026

चाणजे जिल्हा परिषदाचे उमेदवार सिद्धि कडू व केगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार महेश म्हात्रे यांच्या प्रचाराचा झंजावात !!

चाणजे जिल्हा परिषदाचे उमेदवार सिद्धि कडू व केगाव पंचायत समिती गणाचे उमेदवार  महेश म्हात्रे  यांच्या प्रचाराचा झंजावात !!

** डोअर टू डोअर प्रचार करून मतदारांशी साधत आहेत संवाद.

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : उरण पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूक २०२६ साठी गट क्रमांक ५५ केगांव पंचायत समिती गण चे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार महेश महादेव म्हात्रे व सामाजिक सेवेसाठी नेहमी तत्पर असलेल्या सिद्धी कडू यांनी आपला निवडणूक प्रचार सुरू केला आहे. त्यांच्या प्रचारात "विकासाचा आणखी एक अध्याय लिहिण्यासाठी सज्ज" असा संदेश दिला जात आहे.

 सामान्यांचा आवाज , सदैव जनते सोबत, संवेदनशील नेतृत्व, आधुनिक विचार, सक्षम नेतृत्व, आणि प्रामाणिक अभ्यासू नेतृत्व हे महेश म्हात्रे यांची ओळख आहे तर उत्तम व सक्षम महिला नेतृत्व, सामाजिक जाण असलेल्या महिला सामाजिक कार्यकर्त्या अशी सिद्धी कडू यांची ओळख आहे. त्यांच्या प्रचारात "संघर्ष हा आम्हाला वाटतो म्हणून घेतला आहे त्यामुळे लढायच हे आमच्या मनगटातच आहे, रक्तातच आहे " असा संदेश दिला जात आहे.



चाणजे जिल्हा परिषद सदस्य पदासाठी सिद्धि सागर कडू तर केगाव पंचायत समिती सदस्य पदासाठी महेश म्हात्रे निवडणूक रिंगणात उभे आहेत.उमेदवार महेश महादेव म्हात्रे यांची निशाणी खटारा (बैलगाडा) आहे.तर सिद्धी कडू यांची अंधाराकडून नेहमी प्रकाशा कडे घेऊन जाणारी मशाल हि त्याची निशाणी आहे.त्यांच्या निवडणूक प्रचारात त्यांनी विकास आणि प्रगतीच्या मुद्द्यांवर जोर दिला आहे. उरण पंचायत समितीच्या निवडणुकीत मतदारांना विकासाच्या नव्या अध्यायाची निवड करण्याचे आवाहन त्याच्या कडून केले जात आहे.सिद्धि सागर कडू, महेश म्हात्रे यांना दिवसेंदिवस जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून हे उमेदवार बहुमताने निवडून येतील असा आत्मविश्वास पदाधिकारी कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...