Monday, 2 February 2026

वीर वाजेकर महाविद्यालयात"वार्षिक क्रीडा" स्पर्धेचे उद्घाटन !!

वीर वाजेकर महाविद्यालयात"वार्षिक क्रीडा" स्पर्धेचे उद्घाटन !!

उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : फुंडे-रयत शिक्षण संस्थेचे, वीर वाजेकर महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष-२०२५-२६ च्या वार्षिक क्रीडा स्पर्धेचे उदघाटन संपन्न झाले. वार्षिक क्रीडा स्पर्धांचे उदघाटन रविंद्र पाटील ट्रस्टी जे.एन.पी.ए.यांच्या हस्ते मैदानाचे पूजन व नारळ वाढवून करण्यात आले. प्रभारी प्राचार्य  डॉ.आमोद ठक्कर, डॉ.श्रेया पाटील कार्याध्यक्ष, महाविद्यालयातील उपप्राचार्य, सर्व प्राध्यापक व महाविद्यालयातील सेवक उपस्थित होते.रविंद्र पाटील यांनी आपल्या मनोगतातून खेळाडूना प्रोत्साहन दिले, खेळ हा मानवी जीवनात अत्यंत महत्त्वाचे असते. खेळाडूनी खेळात मित्रत्व जपले पाहिजे असे त्यांनी सांगितले. यावेळी त्यांच्या हस्ते  सामन्यांचे उदघाटन झाले. 

प्रा.देवेंद्र कांबळे क्रीडा संचालक यांच्या माध्यमातून स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .कबड्डी, क्रिकेट,भाला फेक, थाळी फेक, लांब उडी, धावणे, बुद्धिबळ, इत्यादी क्रिडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले .प्राचार्य डॉ.आमोद ठक्कर यांनी खेळाडू विद्यार्थ्यांशी ओळख करून घेतली स्पर्धा अतिशय खेळी-मेळीत व्हायला हवी असे मत व्यक्त केले. वार्षिक क्रीडा स्पर्धांना विद्यार्थ्यांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...