Monday, 2 February 2026

समाधान चांगू कणेकर यांनी पटकाविले सुवर्णपदक !!

समाधान चांगू कणेकर यांनी पटकाविले सुवर्णपदक !!

** पहिली संयुक्त राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा २०२६ नाशिक येथील स्पर्धेत नेत्रदीपक कामगिरी.


उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) : मास्टर्स गेम्स असोसिएशन आयोजित पहिली संयुक्त राष्ट्रीय मास्टर्स स्पर्धा २०२६ नाशिक येथे दिनांक २८ आणि २९ जानेवारी २०२६ रोजी संपन्न झाल्या.या स्पर्धेत उरणचे सुपुत्र समाधान कणेकर यांनी नेत्रदीपक कामगिरी केली आहे .उरण तालुक्याचे सुपुत्र समाधान चांगू कणेकर यांनी ३५ वर्षांवरील पुरुष या गटामधील ४०० मीटर हर्डल्स मधे सुवर्णपदक आणि १५०० मीटर धावणे मधे रौप्यपदक तसेच २०० मीटर धावणे मधे कांस्यपदक प्राप्त केले आहे.त्यांच्या या यशाबद्दल समाजातील विविध स्तरातून त्यांच्यावर शुभेच्छा व अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

समाधान कणेकर यांनी २००८- ०९ वर्षी युनिव्हर्सिटि तर्फे १२. ५ किमी क्रॉस कन्ट्री स्पर्धेत गोल्ड मेडल मिळविले. त्या नंतर तालुका स्तरीय छोटया छोटया स्पर्धेत भाग घेतला. खडतर प्रवास करत २०१८ मध्ये पी पी एम स्कुल वेश्वि येथे क्रिडा शिक्षक म्हणून रुजू झाले. सुरवातीलाच १०० हुन अधिक मुलांना त्यांनी विविध स्पर्धेत मेडल मिळवून दिले. आज २०२६ पर्यंत त्यांचा हा आकडा वाढतच गेला. समाधान कणेकर यांची उल्लेखनीय कामगिरी बघून इंडियन स्कुल इस्कसलेन्स तर्फे बेस्ट टीचर म्हणून त्यांचा सन्मान झाला. या अगोदर त्यांना वेगवेगळ्या संस्था संघटना तर्फे क्रीडारत्न, द्रोणागिरी भूषण असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...