Monday, 2 February 2026

उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली !!

उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांना श्रद्धांजली !!

उरण दि १, (विठ्ठल ममताबादे) :
 महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचे नुकतेच एका विमान दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूमुळे संपूर्ण देशावर शोककळा पसरली होती. अजितदादा पवार हे निर्भीड स्पष्ट वक्ते, उत्तम प्रशासक, उत्तम राजकारणी होते.सर्वांच्या मनावर त्यांनी अधिराज्य गाजविले होते. त्यांनी आपल्या कार्यकाळात उत्तम असे प्रशासन चालवले होते त्यामुळे त्यांच्या निधनाने सर्वत्र शोक व्यक्त करण्यात आला. उरण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून तसेच दोन मिनिटे स्तब्ध उभे राहून श्रद्धांजली वाहण्यात आली. 

यावेळी उरण तालुकाध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी अजित दादा पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. असा नेता पुन्हा होणार नाही, सर्वांच्या सुखदुःखात असणारा चांगला नेता एक उत्तम मार्गदर्शक गमावल्याचे परीक्षित ठाकूर यांनी सांगितले. उरण तालुक्यातील नागाव रोड येथील पक्ष कार्यालयात झालेल्या या श्रद्धांजली कार्यक्रम प्रसंगी केगाव पंचायत समिती साठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे निवडणूक लढवणारे उमेदवार परीक्षित ठाकूर, राज्य सरचिटणीस मनोज भगत, नवघर पंचायत समितीचे उमेदवार ऍड. रजनीकांत पाटील, जिल्हा सरचिटणीस विद्याधर घरत, जिल्हा सरचिटणीस रमण कासकर, उरण विधानसभा अध्यक्ष वैजनाथ ठाकूर, जिल्हा चिटणीस रतन म्हात्रे, उरण विधानसभा चिटणीस निलेश पाटील,जिल्हा उपाध्यक्ष भूषण ठाकूर, जिल्हा वाहतूक सेल उपाध्यक्ष नरेश घरत,युवक तालुका अध्यक्ष अखिलेश भोईर, युवा सेल तालुका अध्यक्ष मछिंद्र ठाकूर, तालुका चिटणीस नामदेव मढवी आदी मान्यवर उपस्थित होते. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आदी निवडणुका मध्ये साध्या पद्धतीने, पत्रके वाटून प्रचार करण्यात येणार असल्याचे तालुका अध्यक्ष परीक्षित ठाकूर यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !!

वीर वाजेकर महाविद्यालयात 'सायन्स असोसिएशन' तर्फे करिअर मार्गदर्शन संपन्न !! उरण दि २, (विठ्ठल ममताबादे) : रयत शिक्षण संस...