Wednesday, 4 February 2026

महाविकास आघाडीवर मनसेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची नाराजी !

महाविकास आघाडीवर मनसेचे पदाधिकारी- कार्यकर्त्यांची  नाराजी !

उरण दि ४, (विठ्ठल ममताबादे) : आगामी होऊ घातलेल्या जिल्हा परिषदेच्या व पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीचे नेते आम्हाला विश्वासात न घेता ते जर का जाणून बुजून आम्हाला टाळत असतील तर हा आमच्या मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा व कार्यकर्त्यांचा अपमान आहे. त्यामुळे महाविकास आघाडी सोबत आमचा काहीही संबंध नाही. भविष्यात जो पक्ष आम्हाला संधी देईल. त्याच पक्षाला आम्ही या निवडणुकीत मदत करणार असल्याची माहिती मनसेचे जिल्हाध्यक्ष संदेश ठाकूर व उरण तालुकाध्यक्ष सत्यवान भगत यांनी मंगळवारी (दि.३) आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली. पक्षीय राजकारण बाजूला ठेवून एका विशिष्ट उद्दिष्टासाठी आम्हाला हा निर्णय घेणे हिताचे वाटते. त्यासाठी प्रसंगी भाजपसोबत जरी जावे लागले तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ असेही संदेश ठाकूर व सत्यवान भगत व  यांनी सांगितले.

 जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका येत्या ७ फेब्रुवारीला  पार पडणार आहेत. या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली असून, प्रचारात रंगत आली आहे. प्रचारही जवळजवळ अंतिम टप्प्यात आला आहे. मात्र महाविकास आघाडीचे नेते, कार्यकर्ते आम्हाला प्रचारात सहभागी करून घेत नाहीत. किंवा महत्त्वाच्या सभा, बैठकांनाही  बोलवत नाहीत. त्यामुळे येथील मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली असून, महाविकास आघाडी ताकद दाखविण्यासाठी आमच्या मनसेच्या पक्षाचे झेंडे,  चिन्ह, फोटो प्रचारात वापरत असल्यामुळे, मनसेचे कार्यकर्ते संतापले आहेत.
प्रसार माध्यमांच्या माध्यमातून आमची भूमिका मांडण्यासाठी हे आम्ही पाऊल उचलले असून आमचा त्यांच्याशी या निवडणुकीत कोणताही संबंध नाही. त्यासाठी हि तातडीने पत्रकार परिषद घेतली असून, बातमीच्या माध्यमातून हा मेसेज त्यांच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल. महाविकास आघाडी आम्हाला विश्वासात घेत नाही. यासाठी आम्ही त्यांच्या पक्षाच्या वरिष्ठांशी मोबाईलद्वारे वेळोवेळी संपर्क साधला. मात्र संपर्क करत असताना संपर्क झालाच नाही. असेही त्यांनी स्पष्ट केले. ज्या महाविकास आघाडीच्या लोकांकडून आमच्या अपेक्षा होत्या. त्या पूर्ण झाल्या नसून आमचा भ्रमनिरास झाला आहे. आम्हाला जर सोबत घेऊन प्रचाराचे काम करत नसाल तर आमच्या पक्षाचे प्रचारात झेंडे, चिन्ह, फोटो वापरण्याचा अधिकार तुम्हाला नाही. यासाठी आम्ही त्यांच्या वरिष्ठांना लेखी पत्र व्यवहार करण्याचा प्रयत्न करणार असल्याचे देखील भगत यांनी सांगितले. घटक पक्ष म्हणून आम्ही तुमच्या पाठीशी होतो. परंतु तुम्हाला आमची गरजच भासत नसेल तर आम्ही तुम्हाला का मदत करायची? आवरे पंचायत गणातून मनसेतून आम्ही सुषमा अनिल गावंड यांना उमेदवारी दिली आहे. त्यासाठी आवरे गणात आम्ही जोरदार प्रचारही सुरू केला आहे. तिरंगी लढत होऊन आमचा विजय कसा होईल. हे आम्ही दाखवून देणार आहोत. तालुक्यात ग्रामपंचायतींमध्ये आमचे पाच ते सात सदस्य निवडून आले आहेत. त्यापैकी काहींना उपसरपंच पदे मिळाली आहेत. त्यामुळे तालुक्यात आमची  ताकद आहे. भविष्यात आम्हाला यापेक्षा जास्त जागा जिंकायच्या आहेत. त्यामुळे आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या भावना आम्हाला दुखवायच्या नाहीत. त्या जपायला हव्यात. त्यासाठी हा निर्णय घेतला आहे.  मनसे  ज्या पक्षाच्या सोबत जाईल तिथे आम्ही किंग मेकर राहणार आहोत. असेही भगत यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला मनसेच्या उमेदवार सुषमा गावंड यांचे पती अनिल गावंड उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार !

शिवसेना ग्रा.सं. कक्ष घाटकोपर पश्चिमच्यावतीने वॉर्ड क्र.१२३ चे नवनिर्वाचित नगरसेवक सुनील मोरे यांचा सत्कार ! मुंबई (शांताराम गुड...