डी पी वर्ल्ड न्हावा शेवा कंपनीच्या कर्मचाऱ्यांचे स्नेह संमेलन उत्साहात साजरा !!
उरण दि १३, (विठ्ठल ममताबादे) : डी पी वर्ल्ड न्हावा शेवा कंपनी मध्ये दिनांक ०८/०३ /२००१ रोजी रुजू झालेल्या कामगारांना दिनांक ०८/०३/२०२६ रोजी २५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल रौप्य महोत्सव त्यांच्या कुटुंबा समवेत मोठ्या उत्साहात रामकृष्ण आत्माराम पाटील सभागृह (सोमवंशीय क्षत्रिय पाठारे सभागृह) चिंबळथळी, म्हातवलि उरण येथे साजरा करण्यात आला . या सोहळ्या करिता कंपनी चे सीईओ जीबु कुरियन ईटटि स्वतः हजर राहून कामगारांच्या आनंदात सहभागी झाले व आपला मौलिक वेळ त्यांनी कामगारांना देवून त्यांनी कामगारांना मार्गदर्शन केले व सर्व कामगारांचे कामगारांनी आयोजित केलेल्या या स्नेहसंमेलना बद्दल अभिनंदन केले.तसेच सर्वांचे कौतुक ही केले. कामगारांनी एकत्रित येवून आयोजित केलेल्या स्नेहसंमेलनात छोट्या शाळकरी मुलांचे डान्स परफॉर्मन्स देखील आयोजित केले होते. जागतिक महिला दिना निमित्त महिलांसाठी विविध प्रकारचे खेळ व मनोरंजनात्मक कार्यक्रम देखील आयोजीत केले होते. त्याकरिता सर्व महिला मंडळींनी मोठ्या उत्साहात ह्या खेळांमध्ये भाग घेवून आपला महिला दिन साजरा केला. २५ वर्षे अखंडित सेवे बद्दल आयोजित केलेला कार्यक्रम मोठय़ा उत्साहात पार पाडला.
No comments:
Post a Comment