Monday, 23 March 2026

अशोक खरात व रुपाली चाकणकर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन !!

अशोक खरात व रुपाली चाकणकर यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हावी व सदर प्रकरणाची सखोल चौकशी करावी या मागणीसाठी काँग्रेसचे आंदोलन !!

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : अनेक महिलांवर अत्याचार करून त्यांचे शोषण करणाऱ्या अशोक खरात यांचे सोबत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत.त्यामुळे लवकरात लवकर रूपाली चाकणकरला अटक करून सखोल चौकशी करण्यात यावी व अशोक खरात सारख्या लिंगपिसाट ला कठोर शिक्षा व्हावी या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा  संध्याताई सव्वालाखे यांच्या आदेशानुसार तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड महिला काँग्रेसच्या वतीने उरण मध्ये आंदोलन करण्यात आले.याप्रसंगी रायगड जिल्हा काँग्रेस महिला अध्यक्षा रेखा घरत, निर्मला पाटील,अश्रया शिवकर, सोनाली पाटील, मनिषा पाटील, जयश्री पाटील,प्रमीला पाटील,तुलसा पंडीत, गुलाब पाटील, आशा भोईर, सविता पाटील, ज्योती मढवी,सुमन मढवी, सुलेखा पाटील,चंपा पाटील, पार्वती पंडीत,वर्षा पाटील, इंदुबाई पाटील, जनाबाई पाटील,गुनीबाई पाटील उपस्थित होत्या.

No comments:

Post a Comment

समाज जीवनाचे वास्तव देणारे ज्येष्ठ साहित्यिक ए.डी.पाटील - साहित्य रत्न एल.बी.पाटील यांचे प्रतिपादन !

समाज जीवनाचे वास्तव देणारे ज्येष्ठ साहित्यिक ए.डी.पाटील - साहित्य रत्न एल.बी.पाटील यांचे प्रतिपादन ! उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे...