Monday, 23 March 2026

मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चा बाबत कोलाड येथील बैठकीत सविस्तर चर्चा !!

मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चा बाबत कोलाड येथील बैठकीत सविस्तर चर्चा !!

** भारतीय मजदूर संघातर्फे नियोजनाची तयारी सुरु.

उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे) : रायगड जिल्हा व्यापक कार्यकर्ता बैठक सोमवार दिनांक २३ मार्च २०२६ रोजी तळवली (कोलाड) श्री ज्ञानेश्वर मंदिर येथे संपन्न झाली.या बैठकीत १६ एप्रिल २०२६ रोजी मुंबई येथे होणाऱ्या आक्रोश मोर्चा बाबत सविस्तर चर्चा करून, कामगार मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सहभागी होतील या दृष्टीने गावस्तरावर व उद्योगश: बैठका घेऊन संख्या निश्चित करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी असंघटित/संघटीत क्षेत्रातील कामगारांच्या प्रलंबित प्रश्नाबाबत शासनाचे कामगार विरोधी धोरण व कामगारांवर होणारा अन्याय याबाबत जनजागृती करण्याचा निर्णय झाला. या बैठकीस भारतीय मजदूर संघ प्रदेश सचिव हरी चव्हाण, जिल्हा कार्याध्यक्ष  सुरेश पाटील, जिल्हा सचिव  अशोक निकम यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच बांधकाम जिल्हा अध्यक्ष विकास सुतार, सचिव संतोष सुतार यांनी मोर्चा नियोजन बाबत विचार मांडले. यावेळी  डि.पी.सोनवणे, नामदेव सुतार,  शैलेश पिंपळकर, अंकित सुतार व बांधकाम गाव प्रतिनिधी/औद्योगिक पदाधिकारी/पोर्ट पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

No comments:

Post a Comment

समाज जीवनाचे वास्तव देणारे ज्येष्ठ साहित्यिक ए.डी.पाटील - साहित्य रत्न एल.बी.पाटील यांचे प्रतिपादन !

समाज जीवनाचे वास्तव देणारे ज्येष्ठ साहित्यिक ए.डी.पाटील - साहित्य रत्न एल.बी.पाटील यांचे प्रतिपादन ! उरण दि २३, (विठ्ठल ममताबादे...