शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे सर्वोदय येथून कोकणात जाणाऱ्या एस.टी. बसेस सुरू करण्याबाबत निवेदन !!
** देवरूख, साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या मार्गांवर जाणाऱ्या एस.टी. बसेस घाटकोपर सर्वोदय येथून सोडण्याची मागणी
मुंबई (शांताराम गुडेकर) :
शिवसेना नेते,खासदार व ग्राहक संरक्षण कक्षचे अध्यक्ष मा.श्री.अनिलभाऊ देसाई यांच्या आदेशानुसार तसेच ग्राहक संरक्षण कक्षचे सचिव मा. श्री. निखिलजी सावंत व श्री. अशोकजी शेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली घाटकोपर (पश्चिम) परिसरात मोठ्या प्रमाणावर कोकणातील नागरिक वास्तव्यास आहेत.सध्या कोकणात जाणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस.टी.बसेस पकडण्यासाठी प्रवाशांना चेंबूर येथील मैत्री पार्क येथे जावे लागते. घाटकोपर येथून हे अंतर नागरिकांसाठी खूप लांब पडते. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात गैरसोय सहन करावी लागते. त्यामुळे प्रवास करणाऱ्या व्यक्तीचा वेळ, पैसा वाया जातो. वाहतूक कोंडी मिळाल्यास कधी -कधी एस. टी. ही चुकते. याचा जास्त त्रास दिव्यांग व्यक्ती, जेष्ठ नागरिक, गरोदर महिला, आजारी व्यक्ती यांना सहन करावा लागतो.
या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ग्राहक संरक्षण कक्षाचे विधानसभा संघटक श्री. यशवंत विठ्ठल खोपकर तसेच कक्ष पदाधिकाऱ्यांनी एस.टी. कुर्ला डेपो येथील स्थानक प्रमुख रा.प.कुनेन, कुर्ला डेपो इन्चार्ज श्री.दीपक हेतबे आणि आगार व्यवस्थापक श्री.रवींद्र जाधव यांच्यासोबत चर्चा करून घाटकोपर सर्वोदय येथून कोकणात जाणाऱ्या एस.टी.गाड्या सुरू करण्याची मागणी केली.
विशेषता देवरूख, साखरपा, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा आणि राजापूर या मार्गांवर जाणाऱ्या एस.टी. बसेस घाटकोपर सर्वोदय येथून सोडाव्यात, अशी मागणी करणारे निवेदनही यावेळी देण्यात आले.यावेळी ग्राहक संरक्षण कक्षाचे विधानसभा संघटक श्री.यशवंत खोपकर, कक्ष उपसंघटक श्री. राजेंद्र पेडणेकर, कक्ष वार्ड संघटक श्री. संतोष चांदे, कक्ष प्रतिनिधी श्री. प्रमोद जाधव, श्री. सचिन भालेकर तसेच इतर पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.
No comments:
Post a Comment