कामगार नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांद्वारे साजरा !
खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार विक्रम पाटील, आमदार महेश बालदी यांनी दिल्या शुभेच्छा.
उरण दि १३,'(विठ्ठल ममताबादे) : जगातील सर्वात मोठे बंदर असलेल्या जेएनपीटी बंदराचे कर्मचारी तथा प्रसिद्ध कामगार नेते, भारतीय मजदूर संघाचे कार्याध्यक्ष सुरेश पाटील यांचा वाढदिवस जासई येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या अमृत महोत्सव ७५ वर्षानिमित्त जयजित इंटरप्राईजेस जासई यांच्यावतीने आमदार चषक २०२६ चे आयोजन करण्यात आले होते त्यावेळी कामगार नेते सुरेश पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापण्यात आला यावेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी सुरेश पाटील यांना केक भरून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.यावेळी रामशेठ ठाकूर म्हणाले कि कामगार नेते सुरेश पाटील हे गेली २५ वर्षाहून जास्त काळ माझ्या सोबत काम केले आहे. माझ्याशी एकनिष्ठ राहोलेले आहेत. संघटनाचे काम त्यांनी आजपर्यंत एक निष्ठेने, प्रामाणिकपणे केले आहे. नेहमी त्यांची धावपळ सुरु असते. गोर गरीब कामगारांना न्याय देण्यासाठी ते नेहमी तत्पर असतात. गोर गरीब लोकांसाठी ते झटतात. त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो. त्यांना दीर्घायुष्य लाभो अशी मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो.असे मत रामशेठ ठाकूर यांनी व्यक्त करून शुभेच्छा दिल्या. खासदार धैर्यशील पाटील,आमदार विक्रांत पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी यांनीही कामगार नेते सुरेश पाटील यांच्या कार्याचे, व्यक्तिमत्वाचे कौतुक करत वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. उरण तहसीलदार उद्धव कदम, जय जित चे मालक आणि विशाल शेठ म्हात्रे, अमृत ठाकूर,डीपी सोनवणे, राजन शेठ घरत, रमेश म्हात्रे, बलवंत आदी मान्यवर उपस्थित होते. भारतीय मजदूर संघाचे विविध पदाधिकारी,भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मित्रपरिवार,नातेवाईक,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. मनमिळावू, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, सर्वांना सोबत घेऊन जाणारे, गोर गरीब कामगारांच्या समस्या सोडवण्यासाठी नेहमी कटी बद्ध असणारे व्यक्तिमत्व असल्याने सुरेश पाटील यांच्या वाढदिवसाला मोठ्या प्रमाणात गर्दी पहावयास मिळाली.
No comments:
Post a Comment