Friday, 13 March 2026

स्त्री शक्तीचा सन्मान आणि संस्था पदवीदान सोहळ्याचे आयोजन !!

स्त्री शक्तीचा सन्मान आणि संस्था पदवीदान सोहळ्याचे आयोजन !!

मुंबई, (पंकजकुमार पाटील) : भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबईच्या वतीने "राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा २०२६" आणि संस्था पदवीदान सोहळ्याचे आयोजन शनिवार, १४ मार्च रोजी सकाळी ११:०० ते दुपारी २:०० या वेळेत गुरुकुल सभागृह, वामन हरी पेठे ज्वेलर्स जवळ, रानडे रोड, दादर (पश्चिम), मुंबई या ठिकाणी करण्यात आले आहे.
      स्त्री शक्तीचा सन्मान, हाच खऱ्या अर्थाने राष्ट्राचा अभिमान आहे ! यावेळी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून, समाजात आपल्या कर्तृत्वाने क्रांती घडवणाऱ्या ध्येयवादी महिलांना गौरवण्यासाठी 'भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था' सज्ज झाली आहे.कृषी, आरोग्य, साहित्य, शिक्षण, कला आणि अध्यात्म यांसारख्या विविध क्षेत्रांत आपल्या कार्याचा सुगंध दरवळणाऱ्या महाराष्ट्रातील विजेत्या रणरागिणींना या सोहळ्यात 'राष्ट्रीय पुरस्कारांनी' सन्मानित करण्यात येणार आहे.
     कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे या सोहळ्यात निवडक कर्तृत्ववान महिलांना संस्थेचे सुवर्णपदक (Gold Medal), सन्मान चिन्ह (चषक) आणि मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित केले जाणार आहे.
     तेव्हा आपल्या मित्र-परिवारासह या सोहळ्याला उपस्थित राहून स्त्री शक्तीचा उत्साह द्विगुणित करावा असे आवाहन भारतीय वैदिक विज्ञान संशोधन संस्था, मुंबई यांच्यामार्फत कळविण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी संपर्क : ९३२३०६८८७३ / ९९६७५१३६०९

No comments:

Post a Comment

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ; ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !!

उरण मध्ये आर्थिक फसवणूकीचे सत्र सुरूच ;  ग्रामस्थांना साडेतीन कोटींचा गंडा !! ** १५ ते २० दिवसात पैसे डबल करण्याचे दाखविले जाते आमिष. ** वार...