उल्हासनगरमध्ये महेंद्र अहिरे यांच्यातर्फे भव्य दाखले शिबीर ; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !!
उल्हासनगर, दि. 15 मे 2026*
शाळा व महाविद्यालये सुरू होण्यापूर्वी नागरिकांना उत्पन्न व रहिवासी दाखल्यांची गरज भासते. तहसील कार्यालयात अनेक फेऱ्या मारूनही वेळेवर दाखले मिळत नसल्याने होणारी गैरसोय टाळण्यासाठी 'शासन आपल्या दारी' योजनेंतर्गत महेंद्र अहिरे (माही) यांच्यातर्फे उल्हासनगर कॅम्प 4, सुभाष टेकडी येथे आज भव्य दाखले शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद लाभला.
*दरवर्षीचा उपक्रम*
नागरिकांची होणारी गैरसोय लक्षात घेऊन महेंद्र अहिरे यांच्यामार्फत हा उपक्रम दरवर्षी राबविला जातो. यंदाही शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. उत्पन्न दाखला, रहिवासी दाखला तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी आवश्यक दाखले काढून देण्यात आले.
*घरपोच मिळणार दाखले*
या शिबिरात नोंदणी केलेले सर्व दाखले काही दिवसांत नागरिकांना घरपोच मिळणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. त्यामुळे नागरिकांचा वेळ व पैसा दोन्ही वाचणार आहे.
*मान्यवरांची उपस्थिती*
यावेळी नगरसेविका सुरेखा सुरेश सोनवणे, नगरसेवक विकास खरात, भारतीय मानवाधिकार परिषदेचे अध्यक्ष अभिजीत चंदनशिव, समाजसेवक गणेश मोरे तसेच सुनील जाधव हे मान्यवर उपस्थित होते.
*तहसील कार्यालयाचे सहकार्य*
शिबीर यशस्वी करण्यासाठी तहसील कार्यालयाच्या अधिकारी ज्योती बिरासदार मॅडम, ग्राम महसूल अधिकारी तसेच विजय लाटे सर यांनी मोलाचे सहकार्य केले. नागरिकांनी आयोजकांचे व अधिकाऱ्यांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment