नागपूर-मडगाव विशेष एक्स्प्रेसला नियमित दर्जा: रेल्वे बोर्डाची मंजुरी !!
*नागपूर, दि. 15 मे 2026*
भारतीय रेल्वेच्या मध्य रेल्वे नागपूर विभागातून धावणाऱ्या 01139/40 नागपूर-मडगाव द्वितीय साप्ताहिक विशेष एक्स्प्रेसला नियमित करण्यास रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे. विदर्भ, खान्देश ते कोकण प्रांत जोडणारी ही रेल्वेगाडी आता 11203/04 क्रमांकाने नियमित धावणार आहे.
*नियमित गाडीचे वेळापत्रक*
*11203 नागपूर ते मडगाव*: ही गाडी नागपूर जंक्शन येथून दर बुधवारी व शनिवारी दुपारी 3 वाजून 05 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी गुरुवार व रविवारी सायंकाळी 5 वाजून 46 मिनिटांनी मडगाव गोवा येथे पोहोचेल.
*11204 मडगाव ते नागपूर*: मडगाव गोवा येथून दर गुरुवारी व रविवारी रात्री 8 वाजून 01 मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री 9 वाजून 46 मिनिटांनी नागपूर जंक्शनला पोहोचेल.
*थांब्यांची यादी*
नागपूर ते मडगाव या प्रवासात गाडी वर्धा जं, पुलगाव, धामणगाव, बडनेरा जं, अकोला जं, शेगाव, मलकापूर, भुसावळ जं, नाशिक रोड, इगतपुरी, कल्याण जं, पनवेल जं, रोहा, माणगाव, खेड, चिपळूण, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, राजापूर रोड, कणकवली, कुडाळ, थीवीम गोवा तसेच करमाळी गोवा या स्थानकांवर थांबणार आहे.
*प्रवाशांची मागणी कायम*
विदर्भातून थेट कोकण रेल्वे मार्गावर गाडी नसल्याने अशा गाडीची प्रवासी व प्रवासी संघटनांकडून वारंवार मागणी होत होती. नवरात्र, दिवाळी, नाताळ या गर्दीच्या हंगामात सुरू केलेल्या या विशेष गाडीला आता नियमित दर्जा मिळाला आहे. मात्र वैभववाडी रोड, विलवडे, पेण, मनमाड, चाळीसगाव, पाचोरा, मूर्तिजापूर, चांदुर या स्थानकांवर थांबा मिळावा अशी प्रवाशांची मागणी कायम आहे.
*आरक्षण 16 मे पासून सुरू*
या नियमित रेल्वेसेवेचे संगणकीय आरक्षण http://www.inquiry.indianrail.gov.in, http://www.irctc.gov.in व NTES अॅप तसेच भारतीय रेल्वेच्या आरक्षण खिडकीवर 16 मे 2026 पासून सुरू करण्यात येणार आहे.
*प्रवासी संघटनांचे आवाहन*
11203/11204 नागपूर-मडगाव गोवा द्वितीय साप्ताहिक एक्स्प्रेसचा अधिकाधिक प्रवाशांनी लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रवासी सामाजिक संस्था कल्याण सावंतवाडी संस्थापक अध्यक्ष सुनील उत्तेकर, पुणे कल्याण मार्गे सावंतवाडी रेल्वे प्रवासी समन्वय समिती मुंबई अध्यक्ष यशवंत परब, विदर्भ खान्देश मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रांतप्रमुख वैभव बहुतूले यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
No comments:
Post a Comment