कल्याण तालुक्यात अद्यापही कोव्हीड 19 केअर सेंटर नाही डझनभर लोकप्रतिनिधी तरीही तालुका अपेक्षित!
कल्याण (संजय कांबळे) ठाणे जिल्ह्यात कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढ होत असल्याने अशा रुग्णांना उपचारासाठी अत्यावश्यक असणारे कोव्हीड 19 केअर सेंटर शेजारच्या शहापूर भिवंडी आणि मुरबाड तालुक्यात उपलब्ध होत असताना कल्याण तालुक्यात मात्र अद्याप तरी अशी इमारत मिळाली नसून कल्याण तालुक्याशी या ना त्या निमित्ताने डझनभर लोकप्रतिनिधी संबंध येत असताना असे केअर सेंटर मिळू नये हे समस्त नागरिकांचे दुर्देव म्हणावे लागेल. आणि याच दुर्लक्षामुळे महसूल व जिल्हा परिषद "पहिले आप" ची भूमिका पार पाडत आहेत.
ठाणे शहर, कल्याण डोंबिवली, भिवंडी, वाशी पनवेल आदी महानगर पालिका क्षेत्रात आढळणा-या कोरोनोच्या पेंशंट ची काळजी व उपचार ही जबाबदारी त्या त्या पालिका आयुक्तांची असते तर हे क्षेत्र वगळता ग्रामीण भागात जिल्हाधिकारी हे नोडल आॅफिसर म्हणून काम करतात जिल्हा परिषदेचे सीओ व जिल्हा आरोग्य अधिकारी हे यांच्या सहकार्याने पंचायत समिती परिसरात काम करतात. यामध्ये समन्वय असणे खूप महत्त्वाचे असते. परंतू कल्याण तालुका याला सदैव अपवाद ठरला आहे. मग तो कल्याण पंचायत समितीच्या इमारतीचा प्रश्न असो अथवा इतर.
आता तर तालुक्यातील नागरिकांच्या जिवन मरणाचा प्रश्न निर्माण झाला आहे. जिल्हात कोरोनोच्या रुग्ण संख्येत वाढ होत आहे शेजारच्या मुरबाड, भिवंडी आणि शहापूर आदी तालुक्यात कोव्हीड 19 केअर सेंटर साठी इमारती अधिग्रहित करण्याचे काम जवळपास पूर्ण झाले आहे. ऐवढे दिवस कल्याण ग्रामीण भागात कोरोनाचा शिरकाव झाला नव्हता. पण कोलम येथील एक कर्मचारी कोरोनाचा पाॅझिटिव आला सर्वत्र खळबळ उडाली. तोपर्यंत प्रशासनाने कोणत्याही प्रकारची तयारी केली नव्हती. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना कुठे कोरानटांईग करायचे यावर महसूल व पंचायत समिती यांच्यात उथळ पूथळ झाली. अखेर बदलापूर सोनिवली येथे बीएसयूपी इमारतीत यांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले परंतू तेही मर्यादित असल्याने पेंशंट वाढले तर काय असा प्रश्न उभा राहिला.
या अगोदर वरप, कांबा आणि गोवेली येथील इमारती ताब्यात घेण्याचे पत्रव्यवहार केला होता. परंतू येथून विरोध झाल्याने अवघड परिस्थिती निर्माण झाली यावर लोकप्रतिनिधी किंवा प्रशासनाने कोणीही ठोस व कणखर भूमिका घेतली नाही. अखेर तालुक्यातील पत्रकारांनी या विरोधात रान उठविले यांनतर बदलापूर येथीलच इमारतीची डागडुजी व इतर सोईसुविधा पुरवून कोव्हीड 19 केअर सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला व त्यादृष्टीने जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ मनिष रेगे, प्रभारी तालुका वैद्यकीय अधिकारी पांडुरंग खामकर यांनी पाहणी केली त्यामुळे येथे कोरोनाचे केअर सेंटर सुरू होईल अशी आशा व्यक्त करुया. परंतू यानिमित्ताने "टोलवाटोलवी" काय असते हे मात्र अनुभवायला मिळाले.
No comments:
Post a Comment