लाॅकडाऊनमुळे विहारासह घराघरात सर्वत्र बुद्धं शरणं गच्छामि च्या मंगल स्वरात बुद्ध जयंती साजरी
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) वैशाखी पौर्णिमा अर्थात विश्ववंदनीय अहर्त सम्यक संबुद्ध महाकारुणिक विश्वशांती दूत तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा जन्म दिवस या दिवशी भारतासह संपूर्ण जगात तथागत भगवान गौतम बुद्धांचा जयंती महोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा केला जातो. मात्र या वर्षी भारतासह संपूर्ण जगात कोरोना विषाणूने अक्षरशः थैमान घातले आहे. त्यामुळे संपूर्ण जगात आणि आपल्या भारत देशात कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लाॅकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या लाॅकडाऊन संचारबंदी कालावधीत कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडून त्याचे समूळ उच्चाटन करण्यासाठी, व त्याचा संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी म्हणून संपूर्ण भारतात कोणत्याही प्रकारचे सण उत्सव, जयंती अथवा कोणत्याही प्रकारचे कार्यक्रम सामुहिक पद्धतीने पाच पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन साजरे करू शकत नाही. त्यामुळे या वर्षी गुरुवार दिनांक ०७ मे रोजी आलेल्या बुद्ध जयंती दिनी अर्थात वैशाखी पौर्णिमेला देश विदेशात कुठेही सार्वजनिक स्वरूपात बुद्ध जयंतीचे आयोजन करण्यात आले नाही. त्यामुळे या वर्षी सर्वत्र घराघरातच बुद्ध जयंती निमित्त बुद्धं शरणं गच्छामि चा मंगल ध्वनी घुमला.
कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदीमुळे कोरोना प्रतिबंधक खबरदारी म्हणून या वर्षी बुद्ध जयंतीच्या निमित्ताने या वर्षी रायगड जिल्ह्यातील माणगांव तालुक्यातील बौद्धजन पंचायत समिती आणि भारतीय बौद्ध महासभा या सामाजिक संस्था व स्थानिक पातळीवरील सामाजिक संस्था यांच्या माध्यमातून सालाबादप्रमाणे या वर्षी कोठेही बुद्ध जयंती निमित्त मोठ्या कार्यक्रमांचे आयोजन केले नव्हते. एरवी दर वर्षी बुद्ध जयंतीला महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या संयुक्त जयंतीचे विविध उपक्रमांचे आयोजन करून करण्यात येत असते. मात्र या वर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी आणि शासनाच्या कोरोना पार्श्वभूमीवरील लाॅकडाऊन संचारबंदीचे कुठेही उल्लंघन होऊ नये म्हणून रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील सर्व शाखा खरवली विभाग, माणगांव विभाग, निजामपूर विभाग, इंदापूर विभाग, मोर्बा विभाग, साई विभाग आणि गोरेगांव विभागात तमाम बुद्ध अनुयायांनी आपापल्या विहाराच्या ठिकाणी आणि आपापल्या घरात जमावबंदीचे उल्लंघन न करता सोशल डिस्टन्सिंग चे काटेकोर पालन करून गुरुवार दिनांक ०७ मे रोजी बुद्ध पोर्णिमेच्या दिवशी सकाळी त्रिशरण, पंचशील आणि बुद्ध वंदना ग्रहण करून बुद्धं शरणं गच्छामि च्या मंगल ध्वनी उच्चारण करून अत्यंत साध्या पद्धतीने बुद्ध पौर्णिमा तथा बुद्ध जयंती साजरी केली.
No comments:
Post a Comment