परप्रांतियांना गावी जाण्यासाठी कल्याण येथील भवानी चौक शाखेचे योगदान
प्रतिनिधी कल्याण
कोव्हीड 19 मुळे २४ मार्च पासून लागू केलेल्या संचारबंदी काळात परप्रांतीय कामगार, मजुर वर्ग यांचे रोजीरोटी बुडाल्याने हाल होत आहेत व त्यांना आपल्या मुळ गावी जाण्यास कोणतेही वाहन उपलब्ध नव्हते तर आरोग्य विषयक खबरदारी म्हणून शासन सुध्दा परवानगी देत नव्हते, माननीय मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केंद्र सरकारला विनंती करून परप्रांतीयांना त्यांच्या मुळ गावी जाण्यासाठी रेल्वे चालू केली, त्यानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांनी घोषित केल्याप्रमाणे आपल्या राज्यातून इतर राज्यात जाण्यासाठी तसेच आपल्याच राज्यात इतर शहरे अथवा मूळगावी जाण्या साठी शिवसेना नगरसेवक श्री राजेंद्र देवळेकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भवानी चौक शाखेत शनिवार २ मे सकाळी 10 वाजल्यापासून ७ मे पर्यंत नागरिकांचे अर्ज भरून घेण्यात आले. शाखाप्रमुख सतीश वायचल, परशुराम यादव, रवी मोरे, उपशाखाप्रमुख बबली कांबळे, अरुण राऊळ, सूरज तिवारी, विराज गायकवाड, ज्ञानेश्वर सोनवणे, राकेश तटकरे, विकास जावळे, समीर, नाना कोलते आदी शिवसैनिकांनी मेहनत करून तब्बल हजारो नागरिकांची माहिती भरून घेतली. हे सर्व अर्ज आता संबधीत अधिकारी यांचेकडे देऊन त्यावर शासकीय यंत्रणा निर्णय घेईल. सोशल डिस्टनसिंग पाळून अतिशय कमी वेळात ही माहिती संकलित केली. प्रभाग अधिकारी व पोलीस अधिकारी यांनी भेट देऊन शाखेच्या या कामाचे कौतुक केले. ,
गरीब मजूर,कामगार तसेच अडकलेल्या वृद्ध व्यक्ती, आजारी व्यक्ती यांची माहिती फोन वरून घेतली गेली. देशाच्या विविध भागात जाण्यासाठी नागरिक उत्सुक असून उत्तरप्रदेश साठी या शाखेतच जवळ जवळ ६० टक्के नागरिकांनी नावे नोंदवली आहेत.
या शाखेच्या मदतीने अर्ज भरून काही नागरिक विशेष रेल्वेने आपल्या मुळ गावी रवाना सुध्दा झाले, त्या वेळी केलेल्या सहकार्याबद्दल शिवसैनिकांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment