Friday, 8 May 2020

कोरोना संक्रमण टाळण्यासाठी घरात रहाणे सुरक्षित परंतू मोकळ्या आभाळाखाली संसार असलेले मेंढपाळ कोणत्या घरात आश्रय घेणार ?

कोरोना संक्रमण टाळण्यासाठी  घरात रहाणे सुरक्षित परंतू  मोकळ्या आभाळाखाली संसार असलेले मेंढपाळ कोणत्या घरात आश्रय घेणार  ? 
     बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणूच्या दिवसेंदिवस वाढत चाललेल्या प्रादुर्भावामुळे देश विदेशात सर्वत्र हाहाकार माजला आहे. कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात लाॅकडाऊन संचारबंदी आदेश लागू केला आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन नागरिकांना वारंवार सुचना देत आहे की, घरात रहा सुरक्षित रहा ! नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय कोणत्याही परिस्थितीत घराबाहेर पडू नये. परंतू आपल्या देशात कोरोना विषाणूचा फैलाव तथा संक्रमण होण्या आधीच घाट माथ्यावरील सर्व मेंढपाळांचे तांडे च्या तांडे आपल्या शेळ्या मेंढ्या व संपूर्ण कुटुंब घेऊन चार्याच्या शोधार्थ घाटमाथ्याच्या खाली आपल्या गावांपासून शेकडो किलोमीटर दूर असलेल्या तळकोकणात येऊन अडकून पडले आहेत. 
     कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी शासनाने संपूर्ण देशात सर्वत्र लाॅकडाऊन संचारबंदी आदेश लागू केला आहे. त्याच बरोबर सर्व राज्यांच्या आणि जिल्ह्यांच्या सीमा लाॅक केल्या आहेत. त्यामुळे पुणे, अहमदनगर, सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर इत्यादी ठिकाणच्या घाटमाथ्यावरुन शेळ्या मेंढ्यांच्या गवत आणि चार्याच्या शोधार्थ आपापल्या गावापासून जिल्ह्या पासून शेकडो किलोमीटर दूर तळकोकणात येऊन अडकून पडलेल्या मेंढपाळांना जिल्हा सीमा बंदी मुळे पुन्हा आपापल्या गावाकडे, जिल्ह्याकडे परत जाता येत नाही. त्यामुळे ते सर्व कोकणातच अडकून पडले आहेत. 
     कोकणात येवून लाॅकडाऊन संचारबंदी मुळे अडकून पडलेल्या सर्व मेंढपाळांचे कुटुंब कोरोना सारख्या गंभीर परिस्थितीत कोकणातील राना शिवारात मोकळ्या आभाळाखाली बेघर अवस्थेत राहत आहेत. 
       कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी आणि कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी शासन ठिकठिकाणच्या नागरिकांना वारंवार सुचना देत आहे की, कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोणीही अत्यावश्यक कामा शिवाय घराबाहेर पडू नये. तोंडावर मास्क लावला पाहिजे, वारंवार सॅनिटाइजरने हात धुतले पाहिजे, कोरोना टाळण्यासाठी शासनाच्या सूचनांचे काटेकोर पालन करून नागरिकांनी घरात रहा सुरक्षित रहा. मात्र घरापासून दूर शेळ्या मेंढ्यांच्या चार्याच्या शोधार्थ तळकोकणात येऊन अडकून पडलेले आणि मोकळ्या आकाशाखाली आपल्या कुटुंबाचा संसार मांडलेले मेंढपाळ कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी कोणत्या घराचा आश्रय घेणार ? शासनाने त्यांच्या साठी काही वेगळी व्यवस्था केली आहे का  ? लाॅकडाऊन संचारबंदी मुळे सर्व ठिकाणच्या स्थानिक बाजारपेठा जीवनावश्यक वस्तूंची विक्री वगळता बंद केल्या आहेत. अशा गंभीर परिस्थितीत राज्यातील सर्व मेंढपाळांचे भवितव्य पुर्णपणे अंधारात आणि भीषण संकटात सापडले आहे. म्हणून शासनाने या मेंढपाळांना देखील मदतीचा हात पुढे करावा हीच अपेक्षा आहे.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...