कल्याण (पश्चिम) चे आमदार विश्वनाथ दादा भोईर सर्वोतोपरी नेतृत्व.
प्रतिनिधी, कल्याण
जगभरात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरसमुळे भारत देशात उद्भवलेल्या परिस्थितीत कल्याण पश्चिम चे आमदार विश्वनाथ दादा भोईर हे जसे खंबीर पणे मतदारसंघातील जनतेला धीर देऊन त्यांच्या अडिअडचणीत मदतीला उभे राहिले.
असेच त्यांचे सहकारी व सर्व शिवसैनिक सुध्दा त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत आहेत.
अशा वेळी टिटवाळा येथील रहिवासी विलास काकवीपुरे यांचे नवजात शिशू कल्याण पश्चिम येथील रॉयल चिल्ड्रेन्स हॉस्पिटलमध्ये वेंटीलेटर वर अॅडमीट होता पण विलास काकवीपुरे यांची आर्थिक परिस्थती बेताची असल्याने त्यांना हॉस्पिटलचे बिल रु. २,१८,०००/- भरणे शक्य नव्हते म्हणून त्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे विधानसभा समन्वयक चिराग आनंद यांच्या मार्फत आमदार विश्वनाथ दादा भोईर यांना बिलामध्ये काही सवलत मिळवून द्यावी अशी विनंती केली, त्यावर तात्काळ आमदारांनी सदर हॉस्पिटलशी संपर्क साधून विलास काकवीपुरे यांना रु ५०,०००/- ची सवलत मिळवून दिली.
आमदारांनी तातडीने दखल घेत जी मदत केली त्या बद्दल त्यांनी पत्राव्दारे आमदारांचे आभार मानले.
No comments:
Post a Comment