Wednesday, 13 May 2020

जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या शाळांची कामे कधी? काहीच दिवसांनी शाळा होणार सुरू! विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही!

जिल्हा परिषदेच्या रखडलेल्या शाळांची कामे कधी? काहीच दिवसांनी शाळा होणार सुरू! विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही!


कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या महामारीमुळे संपूर्ण जगच थांबले असून याचा फटका सर्व विभागासह शिक्षण क्षेत्राला बसला आहे. लाॅकडाऊण मुळे प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या असल्या तरी आता काही दिवसानंतर जिल्हा परिषदेच्या शाळा सुरू होणार आहेत. पण रखडलेल्या शाळांची दुरुस्ती आणि थांबलेली शाळांच्या इमारतीची कामे कधी पुर्ण होणार? असा प्रश्न पालकांनी उपस्थित केला असून काही झाले तरी येत्या पावसाळ्यात विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ देणार नाही असा विश्वास कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे यांनी व्यक्त केला आहे.
कल्याण तालुक्यात जिल्हा परिषदेच्या १२० शाळा आहेत. १० हजार ८२७ विद्यार्थ्यांना सुमारे ३८० शिक्षक अध्यापनाचे काम करत आहेत. गोरगरिबांना तसेच कष्टकरी कामगार, शेतकरी, शेतमजूर विटभट्टी कामगार, आदीवाशी, आदी हातावर पोट असणाऱ्या समाजासाठी जिल्हा परिषदेच्या शाळा या मोठा आधार माणला जातो. सध्याच्या परिस्थितीत इंग्रजी शाळांच्या वाढत्या अतिक्रमणात देखील या शाळांनी आपले अस्तित्व टिकवून ठेवले आहे. ते शैक्षणिक पद्धतीमध्ये केलेल्या अमुलाग्रह बदलामुळे, मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षण, आनंददायी अध्ययन, विविध स्पर्धा परीक्षा ची तयारी, प्रशस्त इमारत व भौतिक सुविधा, यासह मुलांच्या व्यक्तीमत्व विकासासाठी शालेय पोषण आहार व मध्यान्ह भोजन, सावित्रीबाई फुले दत्तक पालक योजना, मागासवर्गीय सा द. पा योजना, सुवर्णमहोत्सवी शिष्यवृत्ती योजना, उपस्थिती भत्ता, इत्यादी मुळे या शाळा टिकून आहेत. तसेच सध्या कोरोना १९ चे प्रादुर्भाव रोखण्यासाठी लाॅकडाऊण असले तरी शिक्षक व्हाॅटृस अप व दिक्षा एॅपचे माध्यमातून विद्यार्थ्यांशी संवाद साधला जात आहे.  आणि शाळा प्रवेशाचे जाहिराती करून सन २० - २१ साठी जि.प.शाळांमधे जास्तित जास्त विद्यार्थी प्रवेश होण्यासाठी प्रयत्न करत आहेत.
असे असले तरी लाॅकडाऊणचा दुरगामी परिणाम विद्यार्थ्यांवर झाला आहे. परीक्षा रद्द झाल्या आहेत. दोन ते तीन महिन्यांच्या मोठ्या गॅफ नंतर आता शाळा सुरू होणार आहेत. अशातच अनेक शाळा दुरुस्ती साठी खोलल्या आहेत, तर काही नवीन शाळा बांधकाम सुरू केले होते परंतू लाॅकडाऊण मुळे कामे थांबली आहेत. पिसवली, मांजर्ली, मानिवली, गोळवली आणि घोटसई या जिल्हा परिषद शाळांच्या दुरुस्त्या रखडल्या आहेत. सर्व शिक्षा अभियानांतर्गत या शाळांच्या दुरुस्तीसाठी ५०%अनुदान शाळा व्यवस्थापन समितीचे खात्यावर वर्ग केले आहे. तर नवीन शाळा बांधकामांमध्ये बापसई, चौरे व वावेघर येथील कामे थांबली आहेत.
त्यामुळे मे महिना संपायला आणि जून चालू व्हायला फक्त काही दिवस बाकी आहेत. जूनच्या पहिल्या आठवडय़ात मान्सून पुर्व पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तथापि किती यंत्रणा कार्यान्वित केली तरी पावसाच्या आत शाळांच्या दुरुस्ती व नवीन बांधकामे पुर्ण होईल असे अजिबात वाटत नाही.तसेच लाॅकडाऊण ची अनिश्चितता कायम आहे, त्यामुळे या ठिकाणच्या विद्यार्थ्यांचे काय? ते गळक्या इमारतीत आणि ठिंबकणा-या वर्ग खोल्यांत शिक्षणाचे धडे गिरवणार का? प्रश्न पालक उपस्थित करित आहेत.
या बाबतीत कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे मॅडम यांना विचारले असता त्या म्हणाल्या "सर्व कामे प्राधान्याने करून घेतली जातील तसेच येथील विद्यार्थ्यांची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाईल" 

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...