भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या महिलेला वापरले अश्लील शब्द, विनयभंगाचा गुन्हा!
कल्याण (संजय कांबळे:)
आईला मारहाण करीत असल्याने सोडविण्याकरिता गेलेल्या शेजारी महिलेला अश्लील भाषेत शिवीगाळ करून लज्जा उत्पन्न होईलअसे कृत्य करणाऱ्या युवकाच्या विरोधात खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहने येथे राहत असणारा मयूर पवार यांनी आपल्या आईस मारहाण करण्यास सुरुवात केल्याने वाचवा, वाचवा ! असे बोलून घरा बाहेर पडल्याने शेजारी रहात असणाऱ्या महिलेने मयूर याला जाब विचारला त्यांने चिडून अश्लील शब्दात शिवीगाळ करत शेरेबाजी करत लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. या संदर्भात सदर महिलेने खडकपाडापोलीस स्टेशनला मयूर पवार 25 वर्षे यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा नोंदविला आहे
No comments:
Post a Comment