कल्याण, भिवंडी, शहापूर, मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यात दोनशे सदतीस बोअरवेल, कोरोनोच्या भितीने नागरिकांचा कामाला खो?
कल्याण (संजय कांबळे) ठाणे जिल्ह्यातील संभाव्य पाणीटंचाई दूर करण्यासाठी प्रत्येक वर्षी कृती आराखडा तयार केला जातो. त्यानुसार एप्रिल 2020 ते जून 2020 या कृती आराखड्यात कल्याण, भिवंडी, मुरबाड, शहापूर आणि अंबरनाथ या पाच तालुक्यात सुमारे 237 बोअरवेल ची कामे हाती घेतली असून यातील अनेक कामांना मंजुरी मिळाली आहे. परंतू कोरोनाचा धसका नांगरिकानी इतका घेतला आहे की गावामध्ये बोअरवेल खोदण्यास कडाडून विरोध केला जात असल्याने पावसाळ्यापूर्वी हे काम होणार का असा प्रश्न उभा ठाकला आहे.
ठाणे जिल्हा परिषदेच्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक तालुक्यात बोअरवेल, विंधण विहीर आदी कामे केली जातात. याकरिता तालुक्यातील पाणीपुरवठा विभाग संभाव्य पाणीटंचाई कृती आराखडा तयार केला जातो. त्यानुसार कल्याण तालुक्यातील बेहरे,कोसले, शिरडोण वडवली,, म्हारळ, वरप कांबा, उतणे चिंचवली, पळसोली, राया ओझर्ली, कुंदे, बापसई, दहिवली अडवली, खोणी, दहिसर, फळेगाव, गुरवली, घोटसई, कोलम केळणी, मानवली, वाहोली, पोई, आणे भिसोळ, गोवेली रेवती, आदी ग्रामपंचायतीमध्ये 29 बोअरवेल मंजूर झाल्या असून यासाठी सुमारे 17लाख 40 हजार खर्च अपेक्षित आहे. यासह शहापूर 52, मुरबाड 33,भिवंडी 100 आणि अंबरनाथ 24 बोअरवेल आहेत. सर्वसाधारण पणे मे महिन्यात बोअरवेल खोदल्या जातात. पण लाॅकडाऊण आणि त्यातच पाणी पुरवठा विभागाचा रिपोर्ट, त्यावर गटविकास अधिकारी, तहसीलदार यांच्या स्वाक्षऱ्या, यांनतर तो भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणा कडे तेथून नंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी व अखेर त्यांच्या कडून जिल्हाधिकाऱ्यांकडे, त्यामुळे यामध्ये अधिक काळ जातो. यामुळे आता पावसाळा तोंडावर आला असताना हे शक्य आहे का?
सध्या भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे भू वैज्ञानिक एल एस कदम हे या तालुक्यात पाणी योग्य जागेची पाहणी करून सर्व्हे करित आहेत. त्यांनी आतापर्यंत शहापूर मधील 48, मुरबाड 33,आणि कल्याण मधील 15 ठिकाणी पाहणी करून रिपोर्ट तयार केला आहे. ऐवढ्या अडचणी नंतर देखील भूजल सर्वेक्षण विकास यंत्रणेचे उप अभियंता व कर्मचारी हे भिवंडी तालुक्यातील एका गावात बोअरवेल खोदण्यासाठी गेले असता तेथील ग्रामस्थांनी मात्र कोरोनोच्या धसक्याने या कर्मचाऱ्यांना विरोध करुन परत पाठवले हे असेच चालू राहिले तर अगोदर उशीर झालेले हे काम पावसाळ्यात कसे पुर्ण होणार, चिखलातून बोअरची गाडी कशी चावणार? यामुळे संभाव्य पाणी टंचाई वर उपाययोजना सक्षमपणे राबविता येईल का असे अनेक प्रश्न कर्मचाऱ्यां समोर पडले आहेत.
No comments:
Post a Comment