भवानी चौक शाखेने प्रभाग क्रमांक १६ मधील नागरिकांच्या मदतीसाठी लॉकडाऊनच्या काळात राबविले अनेक उपक्रम
सोमवार दिनांक 18-05-2020 रोजी कोरोना विषयीचे चौथे लोकडाऊन सुरू झाले. या कोरोना विषयीच्या या कालखंडामध्ये आमच्या प्रभाक क्रमांक 16 चे नगरसेवक व मा. महापौर आदरणीय राजेंद्र देवळेकर यांनी आपल्या प्रभागातील नागरिकांना धान्यवाटपासारखे पवित्र काम करतानाच नागरिकांच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेण्यासाठी प्रभागात जंतुनाशक फवारणी, धूर फवारणी इत्यादी सारख्या आवश्यक बाबी सतत पुरवीत असतानाच त्यांच्या शिवसेना भवानी चौक शाखेच्या माध्यमाने " डॉक्टर आपल्या दारी " या नाविन्यपूर्ण उपक्रमा अंतर्गत सलग दुसऱ्या दिवशी दिनांक 19 - 05 - 2020 रोजी कॉलनीतील सर्व नागरिकांसाठी आरोग्य मोबाइल सेवा दिली. हा उपक्रम कल्याण डोंबिवली महानगरपालिका, एच. आय. कल्याण डोंबिवली युनिट व भारतीय जैन संघटना यांच्या सौजन्याने व्यंकटेश सोसायटी, स्फुर्ती सोसायटी, सिद्धेश्वर सोसायटी, स्वप्नपूर्ती सोसायटी, सम्राट सोसायटी, सुयोग्य सोसायटी, व गणराज सोसायटी, तसेच आजूबाजूच्या परिसरात हा स्तुत्य उपक्रम आज राबवण्यात आला. या मध्ये सुमारे 510 नागरिकांनी या आरोग्य सेवेचा लाभ घेतला. काहींना औषधे देण्यात अली. हि सेवा पार पडत असताना नागरिकांनी मास्क चा वापर करून सोशल डिस्टनसिंग ठेवत या सेवेचा परिपूर्ण लाभ घेतला. या प्रसंगी मा. महापौर, नगरसेवक राजेंद्र देवळेकर, डॉक्टर विजय पगारे व त्यांची संपूर्ण टीम, शाखा प्रमुख श्री. सतीश वायचळ, शिवसेना कार्यकर्ते संतोष देवळेकर, सुरेंद्र परब, नाना कोलते, तसेच कॉलनितील सुरेश आहिरे, श्रीकांत घोरबे, नामदेव लब्दे, अभिजित भोसले , प्रकाश खत्री , यदु अगवणे, संदीप आहिरे, नारायण जाधव, शशिकांत तांबे, सुनील पवार, सुरज सोनवणे, प्रवीण लवंदे, सुशील जाधव, शशिकांत आहिरे, हरिष शिरसाठ, विजय चव्हाण, वामन लवंदे, व सौ. सुषमा सुरेश अहिरे ( पोलिस पाटील ) या प्रसंगी उपस्थित होते
सन्मानीय नगरसेवक राजेंद्र देवळेकर, डॉक्टर पगारे व त्याची टीम, तसेच शाखाप्रमुख सतीश वायचळ, शिवसेना कार्यकर्ते परब, नाना कोलते, व इतर सर्व कार्यकर्त्यांचे प्रभागातील त्रिमुर्ती कॉलनीच्या वतीने आभार मानण्यात आले.
No comments:
Post a Comment