शासनाच्या टंचाई कार्यक्रमाची लागली साथ माणगांवातील नऊ ठिकाणी पाणी टंचाईवर केली मात : उप अभियंता वेंगुर्लेकर, शाखा अभियंता बुटाला
बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) माणगांव ग्रामीण पाणी पुरवठा विभाग उप अभियंता माननीय श्री. एस. पी. वेंगुर्लेकर रावसाहेब आणि शाखा अभियंता श्री. एस. व्ही. बुटाला रावसाहेब यांनी कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, रायगड जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून माहे ऑक्टोबर २०१९ ते जून २०२० च्या संभाव्य टंचाई कृती आराखडा प्रस्ताव ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडे केला होता. सदर प्रस्तावाला संबंधित विभागा कडून मंजूरी मिळाली असून सदर टंचाई कृती आराखडा अंतर्गत रायगड जिल्ह्यातील, रोहा, माणगांव, तळा, म्हसळा आणि श्रीवर्धन तालुक्यात एकूण ४४ विंधन विहीरींच्या खोदाई प्रस्तावाला माननीय जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी मंजूरी दिली आहे.
या पैकी माणगांव ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता श्री. एस. पी. वेंगुर्लेकर आणि शाखा अभियंता श्री. एस. व्ही. बुटाला रावसाहेब यांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. या मध्ये रायगड जिल्ह्याच्या माणगांव तालुक्यातील बामणोली, कडापूर,नगरोली,वडगांव बौद्ध वाडी, कुरवडे बौद्धवाडी, वडघर बौद्धवाडी, थरमरी आदिवासी वाडी, पेण तर्फे तळे खालची वाडी, आणि गांगवली ग्रामपंचायती मधील काते आदिवासी वाडी या नऊ ठिकाणी विंधन विहीरींची खोदाई माणगांव ग्रामीण पाणी पुरवठा उप अभियंता माननीय श्री. एस. पी. वेंगुर्लेकर रावसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा अभियंता श्री. बुटाला रावसाहेब यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली करण्यात आली असून लवकरच या ठिकाणी हात पंप बसवण्यात येणार आहेत. उपरोक्त दोन्ही अभियंत्यांच्या प्रयत्नातून या आधी देखील माणगांव तालुक्यातील अनेक गावातील भीषण पाणी टंचाईवर चांगल्या प्रकारे मात करण्यात आली आहे.
माणगांव तालुक्यातील या नऊ ठिकाणी विंधन विहीर खोदाई केलेल्या पैकी केवळ बामणोली आणि गांगवली ग्रामपंचायती मधील काते आदिवासी वाडी वगळता बाकी सर्व ठिकाणी पाणी लागले आहे. त्यामुळे या गावातील लोकांची पाणी टंचाईची समस्या दूर होणार आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातवरण निर्माण झाले आहे.
माणगांव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या माध्यमातून माणगांव तालुक्यातील उपरोक्त गावातील पाणी टंचाई समस्या दूर झाल्याने या नागरिकांनी माणगांव ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उप अभियंता श्री. एस. पी. वेंगुर्लेकर रावसाहेब, शाखा अभियंता श्री. एस. व्ही. बुटाला आणि शासनाच्या संबंधित विभागाचे शाब्दिक स्वरूपात आभार व्यक्त केले.
No comments:
Post a Comment