महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखा कल्याण, अंबरनाथ तर्फे मुख्यमंत्री सहायत्ता निधीस एक लाख रुपये देण्याची तयारी!
कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यातील नांगरिकाना सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात राज्य शासनाने जोरदार तयारी सुरू केली असून यामध्ये आपलाही खारीचा वाटा असावा म्हणून आता कल्याण अंबरनाथ तालुक्यातील शिक्षक पुढे आले असून महाराष्ट्र राज्य शिक्षक सेनेचे वतीने मुख्यमंत्री सहायत्ता निधीस एक लाख रुपये देण्याची तयारी सुरू केली आहे.
राज्यातील वाढत्या कोरोनोच्या धसक्याने सर्व यंत्रणा धास्तावले आहेत. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, नर्स पोलीस कर्मचारी, अंगणवाडी सेविका व आशा कार्यकर्ती मदतनीस,, स्वयंसेवक आदी कोरोना योद्धे म्हणून काम करीत आहेत. हे सैनिक यामध्ये बळी गेले आहेत. स्वतः मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पोलिसांना विश्रांतीची गरज आहे असे सांगितले आहे. या पोलीसाप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी कल्याण (प) येथील डि बी चौकात कर्तव्य बजावत असलेल्या पोलीस नाईक महेंद्र भोई (6367)व जाधव मॅडम या दोन्ही कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक लक्ष्मण गोमा सुरोशे यांनी त्यांच्या मुलीच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मास्क, सॅनिटायझर, बुके व आभारपत्र देऊन गुणगौरव केला. तसेच मुख्यमंत्री सहायत्ता निधीस 5हजार रुपयांचा धनादेश दिला. तसेच महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना शाखा कल्याण व अंबरनाथ यांच्या तर्फे एक लाख रुपयांचा धनादेश देण्यात येईल असे लक्ष्मण सुरोशे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment