अन्याय अत्याचार निर्मुलन समिती भडगांव तालुका अध्यक्षपदी जितेंद्र कांतीलाल रायसिंग यांची नियुक्ती.
पुणे - (अण्णा पंडीत) जळगाव जिल्ह्यातील भडगांव येथिल सुशिक्षित व सुसंस्कृत फुले-शाहु-आंबेडकरी विचारांचे सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र कांतीलाल रायसिंग यांची अन्याय अत्याचार निर्मुलन समिती (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संघटनेच्या जळगांव जिल्ह्यातील भडगांव तालुका अध्यक्ष पदी नियुक्ति झाल्याचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष रविंद्रदादा जाधव. यांनी जाहीर केले आहे.
जितेंद्र रायसिंग हे बिएस्सी.बिएड (एम.ए.मराठी) उच्चशिक्षित असुन ते अन्याय अत्याचार निर्मुलन समिती या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून कार्यरत आहेत. भडगांव शहर व तालुक्यातील खेड्यापाड्यात सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य असुन अल्पसंख्याक वंचित,उपेक्षित व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी त्यांचा लढा अविरत सुरू आहे. त्यांच्या या सामाजिक कार्याची दखल घेऊन त्यांचेवर जळगांव जिल्ह्यातील भडगांव तालुका अध्यक्ष पदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. संघटनेच्या ध्येय धोरणांशी प्रामाणिक राहून संघटना बळकटी साठी प्रयत्न करणार असल्याचे जितेंद्र रायसिंग यांनी सांगितले. लवकरच अन्याय अत्याचार निर्मुलन समिती भडगांव तालुका पदाधिकारी यांचा मेळावा आयोजित करुन उर्वरीत तालुका कार्यकारीणी व काही गावच्या कार्यकर्त्यांचा पदग्रहन समितीच्या प्रमुख पदाधिकारी याच्या उपस्थितीत पदग्रहण समारंभ केला जाईल असे जितेंद्र रायसिंग यांनी सांगितले.
संघटनेच्या नवनियुक्त पदाधिका-यांचे समितीचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव प्रदेश उपाध्यक्षा प्रा.प्रेमलताताई जाधव प्रदेश सचिव महेंद्र तथा (अण्णासाहेब) पंडीत कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव वाघ, उत्तर महाराष्ट्र संघटक मुकेश मधुकर सोनवणे (यावल), राज्य कोषाध्यक्ष सचिनदा गांगुर्डे, प्रदेश संघटक प्रो.अर्चना जागुष्टे, जळगाव जिल्हाध्यक्षा सुचित्रा महाजन, नाशिक जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण, जळगांव जिल्हा सरचिटणीस नसरिन शेख, उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्षा तरन्नुम शेख यांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत.
Congratulations jitendra dada
ReplyDelete