अन्याय अत्याचार निर्मुलन समिती तर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंतीनिमित्त मालेगांव मध्ये धान्य वाटप.
मालेगांव - (अण्णा पंडीत) अन्याय अत्याचार निर्मुलन समिती (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संघटनेच्या वतीने मालेगांव शहर शाखेतर्फे छत्रपती संभाजीराजे यांच्या जयंती चे औचित्य साधून मालेगाव येथील गरीब व गरजू व्यक्तींना अन्नधान्याचा कोरडा शिधा वाटप करण्यात आला.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती नाशिक जिल्हा उपाध्यक्षा वर्षाताई नितिन आहीरे यांनी संपुर्ण अन्नधान्य स्वखर्चाने उपलब्ध करून दिले.
अन्याय अत्याचार निर्मुलन समिती (महाराष्ट्र राज्य) या सामाजिक संघटनेच्या वतीने आता पर्यंत रायगड जिल्ह्यातील पनवेल तालुका, पुणे जिल्हा, नाशिक जिल्हा तसेच निफाड, चांदवड तालुक्यातील खेडोपाडी अनेक गरीब व गरजू कुटुंबीयांना मदत कार्य अविरतपणे चालू ठेवले आहे. संघटनेचे प्रदेश अध्यक्ष रविंद्रदादा जाधव यांचे आदेशाने व स्थानिक जिल्हा पदाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली समाजातील विविध दानशूरांच्या मदतीने विस्थापितांना व गरजवंतांना जिवनावश्यक वस्तुंची मदत करण्याचे अभियान अन्याय अत्याचार निर्मुलन समितीचे वतीने राबविले जात आहे. त्या अभियानांतर्गत संघटनेच्या नाशिक जिल्हा उपाध्यक्षा वर्षाताई आहीरे यांनी स्वखर्चाने मालेगाव येथील सर्व जाती धर्मातील गरजु कुटुंबीयांना अन्नधान्य रुपात कोरडा शिधा वाटप करुन सामाजिक बांधिलकी जोपासली आहे. त्यांच्या कार्याचे समितीचे संस्थापक-अध्यक्ष, रविंद्रदादा जाधव, प्रदेश उपाध्यक्षा प्रेमलता जाधव, राज्य-सचिव महेंद्र तथा अण्णासाहेब पंडीत, प्रदेश संघटीका प्रो.अर्चना जागुष्टे, कोकण प्रदेशाध्यक्ष संतोष चाळके, पुणे जिल्हाध्यक्षा स्मिता दातीर, उत्तर महाराष्ट्र उपाध्यक्ष वसंतराव वाघ, जिल्हाध्यक्षा वैशाली चव्हाण, मालेगाव ता.अध्यक्षा अँड.ज्योती भोसले, निफाड ता.कार्याध्यक्ष प्रकाश गांगुर्डे, जिल्हा कोषाध्यक्ष संदीप साबळे आदींनी कौतुक करुन त्यांचे अभिनंदन केले आहे.
No comments:
Post a Comment