Wednesday, 13 May 2020

:आज होणारे सामुदायिक विवाह सोहळे मांडा-टिटवाळ्यात केले रद्द!

आज होणारे सामुदायिक विवाह सोहळे मांडा-टिटवाळ्यात केले रद्द!

कल्याण (संजय कांबळे) 
कोरोनाच्यां प्रादुर्भावाने अनेक संकटे उद्भवली असून जनमाणसांच्या जीवन पद्धतींवर त्याचा परिणाम दिसू लागला आहे. लॉक डाऊन च्या याकाळात मांडा टिटवाळा येथील संकल्प प्रतिष्ठानाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सामुदायिक अकरा विवाह सोहळा आयोजकांना रद्द करावे लागले आहेत 
प्रथमच संकल्प प्रतिष्ठानच्यावतीने मांडा-टिटवाळा सामुदायिक विवाह सोहळ्याचे गेल्या तीन महिन्यापासून जय्यत तयारी सुरू करण्यात आली होती. मात्र कोरोना मुळेया लॉक डाऊन च्या या पार्श्वभूमीवर आयोजकांना हा सामुदायिक सोहळा नाईलाजास्तव रद्द करावा लागला. यामुळे वधू-वरा मध्ये कमालीची नाराजी पसरली आहे.
संकल्प प्रतिष्ठानाचे विजय देशेकर  यांनी कोरोना मुळे हा सामुदायिक विवाह सोहळा रद्द करण्याचा निर्णय घेत अकरा वधू-वरांनीनाव नोंदविल्याने त्यांचे मनापासून आभार मानत पुढील वर्षी मोठ्या प्रमाणात सामुदायिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...