Wednesday, 13 May 2020

ग्रामीण भागात सर्वत्र मोबाईल नेटवर्कला गेलेत तडे ! आणि शिक्षण विभाग शिक्षकांना म्हणतय द्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे !! हे शक्य आहे का?

ग्रामीण भागात सर्वत्र मोबाईल नेटवर्कला गेलेत तडे ! आणि शिक्षण विभाग शिक्षकांना म्हणतय द्या ऑनलाईन शिक्षणाचे धडे !! हे शक्य आहे का? 
     बोरघर माणगांव ( विश्वास गायकवाड ) कोरोना विषाणू मुक्तीच्या पार्श्वभूमीवर शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे शासनाच्या आदेशानुसार कोरोना विषाणूचा संसर्ग टाळण्यासाठी राज्यातील सर्व सरकारी निमसरकारी शाळा आणि महाविद्यालये उन्हाळी सुट्टी पडण्याच्या आधी पासूनच बंद आहेत. कोरोना विषाणू संसर्ग प्रतिबंधात्मक उपाययोजना व खबरदारी म्हणून शासनाने प्राथमिक शिक्षणाच्या परिक्षा रद्द केल्या आहेत. लाॅकडाऊन च्या कालावधीत ऑनलाईन शिक्षण कार्य चालू ठेवण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने सद्या शैक्षणिक क्षेत्रात स्कूल फ्राॅम होम ( विद्यार्थी, पालक आणि शिक्षक ) यांचा मोबाईल वर वाॅट्सअ ग्रुप तयार करून या वाॅट्सअप ग्रुप च्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना पालकांच्या मोबाईल वरून शैक्षणिक अध्ययन अध्यापन उपक्रमाचे दैनंदिन, साप्ताहिक, मासिक नियोजन करून ऑनलाईन चाचण्या व अभ्यासक्रम ही ऑनलाईन पद्धतीची संकल्पना रुजवण्यासाठी शिक्षण क्षेत्राशी संबंधित यंत्रणेला सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र रायगड जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांचे कार्यक्षेत्र ग्रामीण दुर्गम सह्याद्रीच्या डोंगर दर्यात आहे. त्यामुळे त्या त्या ठिकाणी आजही मुबलक प्रमाणात मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट ची सुविधा नाही त्यामुळे रायगड जिल्ह्याच्या ग्रामीण भागात जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षक म्हणून काम करणाऱ्या शिक्षकांना स्कूल फ्रॉम होम अथवा वर्क फ्रॉम  होम ही ऑनलाईन अध्ययन अध्यापन शिक्षण कार्य प्रणाली ग्रामीण भागात रुजवण्यासाठी मोबाईल नेटवर्क आणि ग्रामीण भागातील आदिवासी वाड्या पाड्यावर असलेल्या शाळेच्या गावातील आर्थिक दृष्ट्या दुर्बल, पोटासाठी मिळेल ते काम व मोलमजुरी करून उदरनिर्वाह करून हातावर पोट असलेल्या अदिवासी विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांकडे अॅन्ड्रॉईड वा स्मार्ट  फोन कुठून येणार. त्यामुळे सदरची सुविधा उपलब्ध नसल्याने प्रचंड अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे रायगड जिल्ह्यातील माणगांव, तळा, महाड, पोलादपूर, म्हसळा, श्रीवर्धन, रोहा, मुरुड, सुधागड, खालापूर , पेण, अलिबाग, कर्जत आदी तालुक्यातील दुर्गम आणि ग्रामीण भागात अद्याप मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट सुविधा उपलब्ध नसल्याने ग्रामीण भागात जीथे मोबाईल नेटवर्कलाच सर्वत्र पडलेत तडे ! तिथे शिक्षक कसे शिकवणार ऑनलाईन अध्ययन अध्यापन शिक्षण कार्य प्रणालीचे धडे !! असे ग्रामीण भागातील जनतेत सर्वत्र शिक्षण विभागाच्या ऑनलाईन शिक्षण कार्य प्रणाली विषयी उपहासात्मक चर्चा सुरू आहे.

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...