Monday, 11 May 2020

महागड्या अलिशान गाड्या राहिल्या दावणीला घरी! संकटकाळात मजूरांच्या सेवेशी तत्पर फक्त महामंडळाची लालपरी !!

महागड्या अलिशान गाड्या राहिल्या दावणीला घरी! संकटकाळात मजूरांच्या सेवेशी तत्पर फक्त महामंडळाची लालपरी !! 
      बोरघर / माणगांव ( विश्वास गायकवाड ) देशातील कोरोना विषाणूच्या दिवसेंदिवस वाढत्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र लाॅकडाऊन संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण देशाच्या कानाकोपऱ्यात ठिकठिकाणी नोकरी धंद्या निमित्त वास्तव्यास असलेले मजूर लाॅकडाऊन संचारबंदी मुळे अडकून पडले. मात्र कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणकारी प्रादुर्भावामुळे शासनाने वाढवलेल्या लाॅकडाऊन मुळे या मजूरांचे राहण्याचे, खाण्यापिण्याचे मोठे हाल होऊ लागले. त्यामुळे हे सर्व मजूर आपापल्या गावाकडे जाण्यासाठी निघाले मात्र देशातील कोरोना विषाणूची संक्रमण साखळी तोडण्यासाठी शासनाने लावलेल्या लाॅकडाऊन संचारबंदी मुळे देशातील सर्व प्रकारच्या वाहतूक सेवा बंद करण्यात आल्या असल्याने मजूरांना आपापल्या गावाकडे जाण्यासाठी पायपीट करावी लागली.लाॅकडाऊन मुळे नोकरी धंदा बंद असल्याने मजूरांच्या खिच्यात पैसा नाही, बाजारातील खाद्य पदार्थांची दुकाने बंद त्यामुळे मजूरांची मोठ्या प्रमाणात उपासमार सुरू झाली. उपाशी  पोटी अहोरात्र गावाकडे पायपीट करून व्याकूळ झालेल्या मजूरांचा काही ठिकाणी शेकडो, हजारो किलोमीटर गावापर्यंत पोहचण्या आधीच हृदयद्रावक स्थितीत अंत झाला. या सर्व प्रकारामुळे मजूरांना आपापल्या राज्यात, जिल्ह्यात सोडण्यासाठी सरकारने एसटी बसेस सुरू कराव्या अशी मागणी सर्व स्तरातून मागणी जोर धरू लागली. या मागणीचा सरकार दरबारी विचार करून या गोष्टीला शासनाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर काही सुरक्षात्मक अटी शर्ती घालून सरकारने सशर्त मंजूरी देऊन राज्यात आणि जिल्हा अंतर्गत महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेस सुरू करण्यात आल्या. 
      कोरोना विषाणू सारख्या महाभयंकर राष्ट्रीय आपत्ती च्या संकट काळात महागड्या अलिशान गाड्यांच्या वाहतूकीवर लाॅकडाऊन संचारबंदी मुळे कायदेशीर निर्बंध आल्याने या सर्व महागड्या अलिशान गाड्या घराघरा समोर दावणीला उभ्या राहिल्या आहेत अशी देशात सर्वत्र परिस्थिती निर्माण झाली आहे. तर कोरोना विषाणूच्या राष्ट्रीय आपत्ती काळात एसटी महामंडळाची अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसेस म्हणजे लालपरी मजूरांच्या सेवेशी तत्पर झाल्या आहेत असे सर्वत्र चित्र दिसून येत आहे.

No comments:

Post a Comment

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न !

जी.के.एस.कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली  तर्फे संशोधन पद्धती व वैज्ञानिक लेखनावर एकदिवसीय कार्यशाळा संपन्न ! मुंबई (शा...