पावसाळ्यापूर्वी रखडलेली कामे पूर्ण होणार का? की यंदाही पूर आणि खड्डेच नशीबी!
कल्याण (संजय कांबळे) कोरोनोच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे जनता अक्षरशः घाबरून गेली आहे लाॅकडाऊण चे तंतोतंत पालन काही लोकांकडून होत आहे. परंतू काही अतिउत्साही नागरिकांमुळे यावर पाणी फिरवले जात आहे. त्यामुळे हे संकट कधी एकदाचे दूर होते असे प्रत्येकाला झाले आहे. पण यातून कसेबसे सावरत असलेल्या नागरिकांसमोर दुसराच "ब्रम्ह" राक्षस उभा आहे तो म्हणजे लाॅकडाऊण मुळे रखडलेली अनेक कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण होणार आहे का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. की याही वर्षी पुर आणि रस्त्यावरील खड्डे यांना सामोरे जावे लागणार आहे.
संपूर्ण जगात कोरोना कोव्हीड 19 या वैश्विक महामारिने हाहाकार उडविला आहे. ठाणे जिल्ह्यातील शहरी व ग्रामीण भागात आता कोरोनाचे रुग्ण आढळून येत आहेत. दिवसेंदिवस लाॅकडाऊण वाढल्यामुळे बांधकाम, मजुरी, वेठबिगारी, नाका कामगार म्हणून काम करणाऱ्या परप्रांतीयांचे जथेच्या जथे पायी, सायकल, रिक्षा, मोटारसायकल, ट्रक अशी जी वाहने मिळतील त्या वाहनांनी मुळ गावी निघाले आहेत. एकटय़ा म्हारळ वरप कांबा या परिसरात ३/४ हजार परगावी जाणाऱ्यांची नोंद झाली आहे तर खडवली, गोवेली येथे अद्यापही सुरू आहे. ही सर्व लोक रस्त्याच्या कामावर, गटारे, पुल इमारती दगडखाण, अशा कष्टप्राय क्षेत्रात काम करणारे असून सध्याच्या परिस्थितीत गोवेली टिटवाळा रस्ता, रायते दहागाव रस्ता, दहागाव बदलापूर रस्ता, कल्याण नगर महामार्ग, मुरबाड म्हसा कर्जत रस्ता, म्हसा धसई रस्ता, मुरबाड शहापूर सरळगाव किन्हवली , अशा छोट्या मोठ्या रस्त्यावरील पुल, मो-या, संरक्षक कठडे, भिंत, यासह महत्वाकांक्षी असा मुंबई नागपूर समृद्धी महामार्ग, मुंबई वडोदरा एक्स्प्रेस हायवे, अशी कामे सुरू होऊन लाॅकडाऊण च्या कचाट्यात अडकली आहेत
यासह अनेक गावातील अंतर्गत रस्ते गटारे, जिल्हा परिषद शाळेच्या इमारती, दुरुस्ती अशी शेकडो कामे बंद आहेत. समजा ती सुरु करण्याचा प्रयत्न केलाच तर मजूर कोठून आणणार? मजूर मिळाले तरी ही कामे पावसाळ्यापूर्वी पुर्ण होणार का हा मोठा यक्ष प्रश्न आहे. पावसाळा तोंडावर आला आहे. आणि अजून तरी कोरोनाचे संकट टळले नाही. मागील वर्षी आलेल्या पुरामुळे म्हारळ वरप कांबा पावशेपाडा रायते, खडवली जू वालधुनी, या गावांना अधिक फटका बसला होता. तर रस्त्यावरील खड्ड्यांमुळे अनेकांचा जीव गेला होता. त्यामुळे याही वर्षी मागील वर्षाची पुनरावृत्ती होणार की प्रशासन वेळीच उपाययोजना करणार? हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईलच! कारण पुढील काळ हा सर्वाच्याच कसोटीचा काळ असणार ऐवढे नक्की.
No comments:
Post a Comment