Thursday, 25 June 2020

"वाचाळवीर गोपचंद पडळकर ची जीभ कापून आणून देणाऱ्याला पाच लाखाचे बक्षीस" .. *अविनाश देशमुख*

"वाचाळवीर गोपचंद पडळकर ची जीभ कापून आणून देणाऱ्याला पाच लाखाचे बक्षीस" .. *अविनाश देशमुख*


बदलापूर :-अरूण ठोंबरे 
राष्ट्रवादीचे शरद पवार हे महाराष्ट्राला लागलेला करोना आहे अशी टीका भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.शरद पवार यांनी बहुजन समाजावर अन्याय केला आहे, असा आरोपही पडळकर यांनी केला आहे.पवार हे धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत सकारात्मक नसून फक्त राजकारण करत असल्याचा आरोप आ.पडळकर यांनी आज पंढरपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत केल्यानंतर त्यांचे पडसाद उमटायला सुरूवात झाली आहे.पडळकर यांच्या वक्तव्याचा निषेध
आज राष्ट्रवादी काँग्रेस बदलापूर कडून श्री  कालीदास देशमुख ह्यांच्या नेतृत्वाखाली  वाचाळवीर गोपचंद पडळकर  ह्यांच्या फोटोला काळी शाही आणि जोडमार आंदोलन करून  रस्त्यावर उतरून निषेध  केला . यावेळी वेळी  अविनाश  देशमुख जे अजितदादा पवारचे खास माणूस आणि बदलापूर ग्रामिणचे आक्रमक नेतृत्व म्हणून ओळखले जातात. त्यांनी आक्रोश करत आपला राग व्यक्त करत म्हणाले की,  जो कोनी पडलकरची जीभ कापून आणील त्याला रु 5 लाख बक्षीस देण्यात येईन.

यावेळी महाराष्ट्र प्रदेश चिटणीस कालिदास देशमुख, जिल्हा उपाध्यक्ष ठाणे ग्रामीण अविनाश देशमुख, जिल्हा युवक उपाअध्यक्ष जितेंद्र पाटील, जिल्हा सदश अनिशा खान, उपाध्यक्ष दिनेश धुमाळ, युवती अध्यक्ष सायली बळीद, एन डी पाटील, लक्ष्मण फुलवरे , पप्पू भोईर, सुनिद्र पगारे,  क्रांती पष्टे,ज्योती वैद्य  इतर पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !!

शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष घाटकोपर (प.) तर्फे  विविध गॅस एजन्सींना भेट देऊन चर्चासह दिले निवेदन !! युद्धजन्य परिस्थितीमुळे घरगुती गॅस सिलें...