Wednesday, 3 June 2020

कल्याणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पिसवली येथे झाड कोसळले, ग्रामीण भागात रस्त्यावर झाडे पडली !

कल्याणला निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा पिसवली येथे झाड कोसळले ग्रामीण भागात रस्त्यावर झाडे पडली!



कल्याण (संजय कांबळे) निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा कोकण किनारपट्टी ठाणे मुंबई पालघर यासह कल्याण शहराला बसला असून कल्याण पुर्व पिसवली येथील बालाजी काॅलनी या बैठ्या चाळीच्या मागे भलेमोठे झाड कोसळले. दुर्दैवाने ते चाळीवर कोसळले असते तर मोठ्या प्रमाणात जिवीत हानी झाली असती. कल्याण ग्रामीण भागात देखील रस्त्यावर झाडे पडल्याचे वृत येत आहे.
अपेक्षेप्रमाणे निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा रायगड, रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली, मंडनगड, गुहागर रोहा आणि अलिबाग या तालुक्याना बसला पण हे वादळ पुढे मुंबई कडे सरकताना ठाणे कल्याण या शहरांना जबर फटका बसला सायंकाळी तीन ते चार वाजल्यापासून या परिसरात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत होता. या वादळामुळे कल्याण पूर्व पिसवली बालाजी काॅलनी चाळ नं 12या मागे भले मोठे झाड कोसळले यामुळे चाळीच्या ड्रेनेजची व पाण्याची लाईन उखडली, या चाळीत 50/60 कुंटूब राहत आहेत. हे वादळ पुर्वेकडून होते म्हणून आम्ही वाचलो तेच जर पश्चिमेकडून असते तर हे झाड चाळीवर कोसळले असते व मोठय़ा प्रमाणात जिवीत हानी झाली असती असे येथील रहिवासी गणेश कासार यांनी सांगितले.


दरम्यान या वादळामुळे टिटवाळा उशीद, कल्याण मुरबाड, शहापूर कल्याण आदी रस्त्यावर छोटी मोठी झाडे पडली तर कल्याण परिसरात 15ते 20 झाडे पडल्याच्या घटना घडल्याचे कल्याण तहसीलदार दीपक आकडे यांनी सांगितले. ग्रामीण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. (फोटो आहेत)

No comments:

Post a Comment

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !!

नगरसेविका सौ. पायल किशोर सौरखादे यांच्या पुढाकाराने रस्त्याचे काम पूर्ण !! ** नागरिकांकडून जाहीर कौतुक अंबरनाथ, विशाल कुरकुटे : ...