घरे शाळा झाडे आणि बक-या निसर्ग चक्रीवादळाच्या चक्रात!
कल्याण (संजय कांबळे) राज्यावर आलेल्या निसर्ग चक्रीवादळाच्या संकटात कल्याण तालुक्यातील आणि महानगर पालिका क्षेत्रातील घरे, शाळा, झाडे बाधित झाले आहे तर बक-या चा यामध्ये जीव गेला आहे. याबाबत अत्यल्प नुकसान झाल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आले.
सध्या राज्यातील नागरिकांवर कोरोनाचे भंयकर संकट आहे. अशातच काल निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला रायगड, रत्नागिरी, अलिबाग, रोहा, श्रीवर्धन या शहरांना जबर फटका बसला. पण हे चक्रीवादळ इगतपुरी, नाशिक कडे सरकताना कल्याण पालिका व कल्याण ग्रामीण भागास कमी अधिक प्रमाणात तडाखा बसला यामध्ये पालिका क्षेत्रात 7घरे तर कल्याण तालुक्यात 5 अशी एकूण 12 घरांचे नुकसान झाले तर 50 झाडे, तसेच कल्याण पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या जि प शाळा उतणे या शाळेचे कौले उडालेली असून वासे सरकले आहेत. त्यामुळे या वर्गात मुले बसू शकत नसल्याचे उतणे येथील शालेय व्यवस्थापन समितीने व मुख्याध्यापक यांनी कल्याण पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती शशिकला अतरगे मॅडम यांना कळवले आहे. तर या बाबतीत कल्याण तहसील कार्यालयात संपर्क साधला असता कल्याण तालुक्यात अत्यल्प नुकसान झाले असल्याचे सांगण्यात आले.



No comments:
Post a Comment