Thursday, 4 June 2020

कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी तर रस्त्यावरील खड्ड्यांचे दर्शन!

कल्याण तालुक्यात मुसळधार पाऊस सखल भागात पाणी तर रस्त्यावरील खड्यांचे दर्शन!



कल्याण (संजय कांबळे) कालच्या निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यानंतर आज पहाटे पासून कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागाला झोडपून काढले यामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले तर पहिल्याच पावसामुळे खड्यांचे दर्शन झाले.


काल निसर्गाच्या चक्रीवादळाने कल्याण परिसराची चांगलीच दैना केली पिसवली येथे झाड कोसळले तर टिटवाळा येथे विद्यूत खांब वाकले तर काही ठिकाणी विद्यूत तारा एकमेकावर पडल्या यामुळे विद्यूत पुरवठा खंडित झाला होता. रायते येथील काही लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले होते आपटी येथील शेतकऱ्यांचे भाजीपाला पीकांचे नुकसान झाले. . तर मुरबाड तालुक्यात देखील नवीन बांधलेल्या घरावरील पत्रे उडून गेले. या सर्व संकटातून बाहेर येतो ना येतो तो पर्यंत सकाळी पहाटेपासून तालुक्यातील म्हारळ वरप कांबा पावशेपाडा, रायते आणे भिसोळ आपटी, अनखर गोवेली फळेगाव मानिवली पिंपळोली बापसई उशीद वाशिंद काकडपाडा आदी परिसरात तूफान पाऊस पडला यामुळे वरप, पावशेपाडा बस थांबा पेट्रोल पंपासमोर म्हारळ येथील एम आय डि सी रस्ता व इतर ठिकाणी सखल भागात पाणी साचले होते.
तर या पावसामुळे दहागाव रायते, गोवेली टिटवाळा, निंबवली राया, खडवली उशीद गेरसे निंबवली सांगोडे रस्त्यावर खड्यांचे दर्शन झाले. जागोजागी या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी भरले होते. दुपारी बारा नंतर पावसाने उघडिप दिली होती. या पावसामुळे अनेक शेतात पाणी साचले होते.

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...