Friday, 3 July 2020

"NUJM शिरुर तालुका अध्यक्षपदी AM न्यूज चे सचिन धुमाळ यांची निवड"!

"NUJM शिरुर तालुका अध्यक्षपदी  AM न्यूज चे सचिन धुमाळ यांची निवड"!



शिरुर : नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस महाराष्ट्र ( NUJM )पुणे जिल्ह्याची शिरुर तालुका कार्यकारिणी बैठक आज शिरुर इथे पार पडली झाली. 
     युनियनच्या राज्याच्या अध्यक्ष शीतल करदेकर यांच्या आदेशाने,पुणे जिल्हा अध्यक्ष सचिन चपळगावकर यांच्या  मार्गदर्शनाने जिल्हा कार्याध्यक्ष-रायचंद शिंदे यांच्या उपस्थितीत आणि जुन्नरचे माजी अध्यक्ष सचिन डेरे  यांच्या अध्यक्षतेखाली  वार्षिक सभा आणि 
 नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली 
        शिरूर तालुका अध्यक्षपदी AM न्यूज चे प्रतिनिधी सचिन धुमाळ, उपाध्यक्षपदी SAC न्यूज चे संपादक अमोल दरेकर , कार्याध्यक्षपदी  साप्ताहिक शिरूर-हवेली च्या मुख्य संपादिका शोभा परदेशी सचिव पदी समाजशील न्यूज चे मुख्य संपादक देवकीनंदन शेटे, सहसचिवपदी शिरूर तालुका डॉट कॉम'चे मुख्य संपादक तेजस फडके, खजिनदारपदी AM न्यूज चे रुपेश चापुडे आणि समन्वयक पदी पुणे 24 तासचे संपादक प्रमोल कूसेकर यांची निवड करण्यात आली.
युनियनचे सदस्य पुढीलप्रमाणे
हेमंत चापूडे ( झी 24 तास ) अतुल थोरवे ( SAC न्यूज ) लक्ष्मण गव्हाणे, साहेबराव चव्हाण, अनिल पाचर्णे , प्रकाश गवळी, सुवर्णा चिपाडे ( साप्ताहिक शिरूर-हवेली) 
नंदकुमार शहाणे ( साप्ताहिक घोड गंगेच्या तीरावर ) , अमृतेश झांबरे, किरण झांबरे ( साप्ताहिक उद्योग अमृत), विनायक साबळे ( महाराष्ट्र न्यूज), शरद शेळके ( समाज दर्पण ), सागर रोकडे, आदिनाथ रोकडे ( पुणे 24 तास ), प्रमोद लांडे ( लोकशाही न्यूज ) संपत कारकुड, किरण पिंगळे ( शिरूर तालुका डॉट कॉम ) मच्छिंद्र खैरनार ( CSM न्यूज )
शीतल करदेकर यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष सचिन धुमाळ,कार्याध्यक्ष शोभा परदेशी यांचे या मिटींगनंतर अभिनंदन केले आणि हे पद ही मोठी जबाबदारी असून आपण सर्व उत्तम काम कराल असा विश्वास व्यक्त केला 
संघटन सचिव कैलास उदमले यांनी संपूर्ण टीमचे अभिनंदन केले
           दरम्यान कोरोना काळात झालेल्या बैठकीत सोशल डिस्टनसिंग पाळत, मास्क व सॅनिटायझरचाही वापर  करण्यात आला.
-------------------------

No comments:

Post a Comment

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !!

संघर्षातून समाजप्रकाशाकडे — राजेंद्र पाटील यांना ‘उत्कृष्ट समाजसेवक’ दादासाहेब फाळके पुरस्कार !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : ...