"प्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचं निधन"
मुंबई - प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका (कोरिओग्राफर) सरोज खान यांचं रात्री उशिरा हृदयक्रिया बंद पडल्याने मुंबईत निधन झाले.
त्या ७१ वर्षांच्या होत्या. सरोज खान यांच्यावर १७ जूनपासून वांद्रे येथील गुरुनानक रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वास घेण्यास त्रास होत असल्याने तिथे दाखल करण्यात आले होते.
मिळालेल्या माहितीनुसार रात्री १.५२ मिनिटांनी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर मुंबईतील चारकोप कब्रस्तानमध्ये अंतिम संस्कार होणार आहेत.
सरोज खान या मुधमेह आणि त्यासंबंधित विविध आजारांनी ग्रस्त होत्या. रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्यांची कोरोना चाचणीही घेण्यात आली होती. त्याचा अहवाल निगेटिव्ह आला होता.
त्यांनी अनेक वर्षे आपल्या कामातून ब्रेक घेतला होता. परंतु, मागील वर्षी (२०१९) त्यांनी पुनरागमन करत मल्टिस्टारर सिनेमा कलंक आणि कंगना रनौतचा सिनेमा ‘मणिकर्णिकाः द क्वीन ऑफ झांसी’ यातील एक-एक गाण्यांचे नृत्यदिग्दर्शन केले होते.

No comments:
Post a Comment