Monday, 20 July 2020

मुरबाड न.प.चा लाँकडाऊन संपला !! *प्रतिबंधित क्षेत्र वगळता बाकी बाजार पेठ सुरु *

मुरबाड न.प.चा लाँकडाऊन संपला !! *प्रतिबंधित  क्षेत्र वगळता बाकी बाजार पेठ सुरु *


मुरबाड ( मंगल डोंगरे ): मुरबाड तालुका आणि शहरातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी  जिल्हा अधिकारी आणि तहसिलदार मुरबाड यांच्या आदेशाने मुरबाड नगर पंचायत हद्दीत  13 जुलै ते 20 जुलै 2020 असा पुकारण्यात आलेला लाँक डाऊन उद्या मंगळवार दिनांक 21/07/2020 ,पासून शिथिल करण्यात आला असुन प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर आस्थापना आणि दुकाने नेहमी प्रमाणे सकाळी 9-00 ते सांयंकाळी 7-00वाजे पर्यंत चालू ठेवण्याचा निर्णय  मुरबाड नगर पंचायतीने एका आदेशाद्वारे जनहितार्थ जारी केला असल्याचे मुख्याधिकारी  परितोष कंकाळ जाहीर केला आहे.
           मुरबाड शहरातील कोरोना रुग्णांची अचानक वाढलेली संख्या पाहता,नगर पंचायतचे लोकप्रतिनिधी तसेच प्रशासनाने तहसीलदार अमोल कदम यांना लेखी पत्राद्वारे कळविले होते.त्यानुसार जिल्हाधिका-यांच्या आदेशा नुसार आठ दिवसांसाठी सदरचा लाँकडाऊन घोषित करण्यात आला होता.मात्र सर्व सामान्य जनतेची जिवनावश्यक वस्तुंबाबत होणारी गैरसोय लक्षात घेऊन लाँक डाऊन स्थगितीचा निर्णय घेतला आहे.परंतु यावेळी बाजार पेठेतील दुकाने सुरु करताना एक नियमावळी तयार केली असुन ,त्याप्रमाणे दुकाने सुरु राहतील.त्यात रस्त्याच्या दुतर्फा पुर्व-पश्चिम, सम विषम तारखे प्रमाणे दुकाने सुरु राहतील.याशिवाय दुकानांची जागा भविष्यात प्रतिबंधित म्हणून बाधित झाल्यास, जिवनावश्यक वस्तू, दवाखाने,मेडिकल, वगळुन बाकीचे सर्व व्यवसाय ते क्षेत्र पुर्ववत होई पर्यंत बंद राहतील. तसेच हाँटेल,रेस्टाँरंट,पोळी भाजी केंद्र, पार्सल व्यवस्थे पुरती सुरु राहतील. शाँपिंग माँल,दुकान केंद्रे, पाणपट्टया, गुटखा, तंबाखू, अंडा, आम्लेट, चायनीज, पाणीपुरी, पावभाजी गाड्या, नाष्ट्याची ठिकाणे, रसवंती, इत्यादी बंद राहतील.तसेच कुठलेही तयार खाद्य पदार्थ विकण्यास बंदी राहील.ज्या दुकानाना सुरु ठेवण्याची परवानगी दिली आहे.त्यांनी सर्व प्रकारचे नियम,अटी,सोशियल डिस्टंसिंग यांचे काटेकोरपणे पालन करणे बंधनकारक ठरविले आहे.

No comments:

Post a Comment

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !!

नागरी संरक्षण नवी मुंबई समूह ठाणे तर्फे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा; परेड सराव, ध्वजवंदन व स्वयंसेवक क्षमता वृद्धी प्रशिक्षण यशस्वी !! ...