शिवसेनेच्या आंदोलनाच्या इशा-याने महावितरण नरमले !!
*संयुक्त बैठकीत मागण्यांवर सहमत *
मुरबाड ( मंगल डोंगरे ) कोरोना संकटाच्या काळात विजवितरण कंपनीने एप्रिल ते जुन या तिन महिण्यांची भरमसाठ व अवाजवी दिलेली विज बिले दुरुस्त करून द्यावी. अन्यथा शिवसेना जन आंदोलन केल्या शिवाय राहणार नाही. या कडक इशा-याने महावितरण कंपनीने नरमाईची भुमिका घेतली असुन आज महाविरणचे अधिकारी व शिवसेनेच्या पदाधिका-यांच्या झालेल्या संयुक्त बैठकीत शिवसेनेच्या मागण्या मान्य करत असल्याचे कबूल केल्याने मंगळवार दिनांक 21/07/2020 रोजी होणारे शिवसेनेचे जन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.आज झालेल्या या बैठकीस प्रशासकीय अधिकारी म्हणून महावितरणचे कार्यकारी अभियंता रामटेके,उप अभियंता सुराडकर,मुरबाडचे तहसिलदार अमोल कदम,पोलीस निरीक्षक-दत्तात्रय बोराटे,तर शिवसेनेचे सुभाष पवार, तालुका प्रमुख कांतीलाल कंटे,मुरबाड शहर प्रमुख रामभाऊ दुधाळे यांच्या सह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी शिवसेनेच्या वतीने करण्यात आलेल्या मागण्यां मध्ये एप्रिल ते जुन महिण्यांत भरमसाठ दिली गेलेली विज बिले कमी करून सरसकट 3.46.रुपये प्रमाणे प्रति युनिट दर मात्र आकारण्यात यावेत.याशिवाय इंधन आकार,वहन आकार,मिटर भाडे,स्थिर आकार,असे इतर आकार आकारण्यात येवू नयेत.तसेच उर्जा मंत्र्यांनी दिलेले आदेश पाळण्यात यावेत.जोपर्यंत महावितरण लेखी स्वरूपात विजबिल कमी करीत नाहीत तोपर्यंत कुठल्याही विज ग्राहकाचे विज कनेक्शन कापले जावू नये.त्याच प्रमाणे ग्रामीण भागातील लोडशेडिंग कमी करावी.मुरबाड शहरात अनधिकृत व्यावसायिक गाळ्यांना दिलेल्या अनधिकृत जोडण्या कापून ,सडलेले पोल,लोबंकळलेल्या विज वाहिण्यांची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी.विज कंपनीचा गळथान कारभार सुधारण्यांत यावा..अशा प्रकारच्या मागण्यांसाठी आज झालेल्या संयुक्त बैठकीत महावितरण कडून ठोस आश्वासन दिल्याने उद्या होणारे शिवसेनेचे जन आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.मात्र ख-या अर्थाने मागण्या पुर्ण झाल्या नाहीत.आणि गोरगरीबांची लुट थांबवली नाही. तर शिवसेना आपल्या निर्णायावर ठाम राहील असेही शहर अध्यक्ष रामभाऊ दुधाळे यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment