Thursday, 16 July 2020

उल्हासनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी मोहनाळकर यांना हटविण्याची मागणी !

उल्हासनगर महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी मोहनाळकर यांना हटविण्याची मागणी !


उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा प्रार्दुभाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. आशा परिस्थितीत येथील महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी मोहनाळकर हे रुग्णांना आवश्यक असलेल्या सुविधा रुग्ण बेड तसेच इतर औषधोपचार उपलब्ध करून देण्यात अपयशी ठरले आहेत. यामुळे शहरात रुग्ण मृत्युमुखी पडत आहेत. वैद्यकीय अधिकारी मोहनाळकर यांना वारंवार फोन किंवा मेसेज करुन गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे रुग्णांचे हाल होत आहेत हे त्यांचे वागणे अयोग्य आहे.


यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष अॅंड. स्वप्निल पाटील मा. जिल्हाधिकारी ठाणे यांना निवेदन देऊन उल्हासनगर शहरात रुग्णांना बेड तातडीने उपलब्ध करून देण्यात यावे यासाठी स्थानिक नेते व अधिकारी यांनी मतभेद बाजूला ठेवणे गरजेचे आहे.

तसेच शहरात प्रभाग निहाय वैद्यकीय अधिकारी यांची नियुक्ती करावी जेणेकरून प्रभागानुसार रुग्णांची सोय करणे सोईस्कर होईल अशी मागणी केली.

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...