Thursday, 16 July 2020

*बारावीचा आॕनलाईन निकाल जाहिर ! ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालूका अव्वल*!

*बारावीचा आॕनलाईन निकाल जाहिर ! ठाणे जिल्ह्यात मुरबाड तालूका अव्वल*!  


मुरबाड -{ मंगल डोंगरे } : कोरोना संकटात मार्च २०२० मध्ये  घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक शालांत परिक्षेचा निकाल आज जाहीर झाला आहे. या मध्ये यंदा ठाणे जिल्ह्ंयात मुरबाड तालुक्याने बाजी मारली असुन, तालुक्याचा एकूण निकाल 92.83% लागला आहे.  
      डोंगरन्हावे विभाग हायस्कूल डोंगरन्हावे या शाळेचा निकाल १००% टक्के लागला आहे. तर शारदा विद्यालय टोकावडे यांचा  ९९.२५ इतका लागला असून विद्यामंदिर हायस्कूल शिवळे ९६.८२ लागला आहे तर न्यू इंग्लीश स्कूल मुरबाड ९०.९९ इतका लागला , कुडवली जुनियर कॉलेज - ९०%, असोले हायस्कूल विभाग - ८१.५७%, तलवली आश्रम शाळा - ९७.७७%, म्हसा हायस्कूल - ७१.४२%, जनता विद्यालय धसई - ९६.४०%.तर मुरबाड न्यू इंग्लिश स्कूल आर्ट्समधून - नार्वेकर साक्षी-७६.३०%, द्वितीय क्रमांक ढोले दिपाली - ७३.३८%, भोसले ओमकार, बोस्टे ओमकार - ७३.०७% तसेच सायन्स मधून प्रथम क्रमांक पठारे कोमल - ८८.३०%, द्वितीय क्रमांक-शेकाटे अक्षय - ८६.७६%, तृतीय क्रमांक - धुमाळ भाविका - ८३.५३%,तर विद्या मंदिर हायस्कूल शिवले मधून - आर्ट्स-प्रथम क्रमांक- आरती खाटेघरे - ८६.३०%, द्वितीय क्रमांक - शेलवले अमृता - ८५.८४%, सायन्स शिवले-विशे जयदीप - ८२.४६%, द्वितीय क्रमांक बांगर श्वेता - ८१.५३%, तृतीय क्रमांक -मुरबाडे रोहित - ७९.२३%, टोकावडे विद्यालयाची जोत्सना भांगरथ ७९.६९ %गुण मिळवुन शाळेत प्रथम आले तर धसई विद्यालयाची वैजयंती घोलप ७७% गुण मिळवुन प्रथम आली आहे. तसेच विद्या मंदिर हायस्कूल शिवले मधून आरती खाटेघरे हिने ८६.३०% गुण मिळवून  प्रथम क्रमांक पटकावला आहे शिवाय  आरती ही ह.भ.परायण असुन तालुक्यात कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन ही करत असल्याने  संपूर्ण मुरुबाड तालुक्यात तिचे अभिनंदन होत आहे. 

No comments:

Post a Comment

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्तव भयावह

लग्नाच्या बाजारात हुंड्याचा लिलाव; पुरोगामी महाराष्ट्राला लागलेली सामाजिक कीड सुशिक्षित समाजातही ‘हुंडा’ अजूनही जिवंत — कायदे कागदावर, वास्त...