Friday, 3 July 2020

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली प्रदेश कार्यकारिणीची घोषणा !!

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली प्रदेश कार्यकारिणीची घोषणा !!


"आज भाजपच्या 12 प्रदेश उपाध्यक्ष, 5 सरचिटणीस आणि कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. आशिष शेलार विधानसभेत मुख्य प्रतोद, तर प्रतोद म्हणून माधुरी मिसाळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे."

मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. 12 उपाध्यक्ष, पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. एकनाथ खडसे, प्रकाश मेहता आणि विनोद तावडे हे विशेष निमंत्रित प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य म्हणून काम पाहतील. तर पंकजा मुंडे यांनी राज्यापेक्षा केंद्रात लक्ष घालावे ही केंद्राची इच्छा असल्याचे पाटील यांनी सांगितले.

नाराज असलेल्या अनेकांना पक्षसंघटनेत सामावून घेऊन त्यांना परस्पर संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. दर तीन वर्षांनी भाजपची कार्यकारिणी बदलते. मात्र, कोरोना संसर्गामुळे राज्य कार्यकारिणी रखडली होती.

भाजप कार्यकारणी
12 प्रदेश उपाध्यक्ष
5 सर चिटणीस (प्रदेश महामंत्री)
एक कोषाध्यक्ष
5 मोर्चाचे अध्यक्ष

सरचिटणीस - सुजित सिंघ ठाकूर, चंद्रशेखर बावनकुळे, देवयानी फरांदे, रवींद्र चव्हाण, श्रीकांत भारतीय

उपाध्यक्ष : राम शिंदे, जयकुमार रावल, संजय कुटे, माधव भंडारी, सुरेश हाळवणकर, प्रसाद लाड, प्रीतम मुंडे, चित्रा वाघ यांच्यासह इतर नावे आहेत.

कोषाध्यक्ष : मिहीर कोटेचा
प्रतोद : माधुरी मिसाळ
उमा ताई खापरे - महिला मोर्चा अध्यक्ष
विक्रांत पाटील, पनवेल - युवा मोर्चा अध्यक्ष

No comments:

Post a Comment

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !!

सोमवंशी क्षत्रिय पाठारे ज्ञाती समाजाचा पारितोषिक वितरण व सत्कार समारंभ उत्साहात संपन्न !! उरण दि २७, (विठ्ठल ममताबादे) : उरण येथ...